OYO कंपनीच्या नव्या धोरणानुसार चेक-इनच्या वेळी सर्व जोडप्यांना त्यांचा नातेसंबंधाचा वैध पुरावा सादर करावा लागेल.ऑनलाइन बुकिंगसाठीही हे लागू होईल. OYOने आपल्या भागीदार हॉटेल्सना त्यांच्या निर्णयावर आधारित जोडप्यांचे बुकिंग नाकारण्याचा अधिकार दिला आहे, असे कंपनीने सांगितले आहे. या निर्णयाद्वारे कंपनीचा स्थानिक सामाजिक संवेदनशीलता जपण्याचा प्रयत्न आहे.
हिमालयातील 32.6 मेट्रिक टन सोन्याचे रहस्य काय? इथे दडलाय ६०० अब्ज रुपयांचा खजिना
advertisement
OYOचे उत्तर भारताचे प्रदेशप्रमुख पावस शर्मा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले, OYO चा प्रयत्न सुरक्षित आणि जबाबदार आदरातिथ्य पद्धतींना प्रोत्साहन देण्याचा आहे. वैयक्तिक स्वातंत्र्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करत असतानाच, आम्ही आमच्या कार्यक्षेत्रातील कायद्याची अंमलबजावणी तसेच संस्था आणि नागरी समाज गटांसोबत काम करण्याची जबाबदारी देखील ओळखतो. आम्ही या धोरणाचा आणि त्याचा परिणाम काळानुसार आढावा घेत राहू.”
पाणीपुरीवाल्याला आली ४० लाखांची GST नोटीस; UPIद्वारे पैसे घेतल्याने लागला सुगावा
OYOची जुनी प्रतिमा बदलून कुटुंबे, विद्यार्थी, व्यावसाईक, धार्मिक प्रवासी आणि एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी सुरक्षित आणि चांगला अनुभव देणारे हॉटेल म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे असे कंपनीने म्हटले आहे. त्याच बरोबर या नव्या नियमांचा उद्देश ग्राहकांनी दीर्घकाळ राहण्यासाठी म्हणून OYOची निवड करावी, पुन्हा बुकिंग करावे आणि त्यांचा विश्वास संपादन करण्याचा आहे.
OYO ने संपूर्ण देशात काही उपक्रम सुरु केले आहेत. पोलीस आणि हॉटेल भागीदारांसोबत सुरक्षितेवर संयुक्त चर्चासत्रे आयोजित करण्याचा समावेश आहे. त्याच बरोबर अनैतिक कृतींना प्रोत्साहन देणाऱ्या हॉटेल्सना काळ्या यादीत टाकणे आणि OYO ब्रँडिंगचा गैरवापर करणाऱ्या अनधिकृत हॉटेल्सविरोधात कारवाई करणे आदी गोष्टींचा समावेश आहे.
मुलांनो ही चूक केल्यास सर्व काही गमवाल, मोठी किंमत चुकवावी लागेल
भारतात कोणताही कायदा अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये राहण्यास मनाई करत नाही. मात्र, हॉटेल मालक किंवा व्यवस्थापक यांच्या निर्णयानुसार जोडप्यांना चेक-इनची परवानगी दिली जाते.
मेरठमधील काही संघटनांकडून अविवाहित जोडप्यांना OYOमध्ये प्रवेश देऊ नये अशी मागणी करण्यात आली होती. अन्य शहरातील रहिवाशांनी अविवाहित जोडप्यांना OYO हॉटेल्समध्ये चेक-इन करण्यास मनाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर मेरठमध्ये OYO ने आपल्या भागीदार हॉटेल्सना त्वरित हे नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनी हे धोरण इतर शहरांमध्येही लागू केले जाऊ शकते असे अधिकाऱ्यांनी सांगितले.