भारतामुळे पाकिस्तानला मिळाला ६०० अब्ज रुपयांचा खजिना; हिमालयातील 32.6 मेट्रिक टन सोन्याचे रहस्य काय?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Secret Gold In Himalayas: भारत एका बाजूला जगातील सर्वात वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था आहे तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान कर्जबाजारी आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशात पाकिस्तानला तब्बल ६०० अब्ज रुपयांचा खजिना सापडला आहे आणि ते ही भारतातील एका नदीमुळे....
इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यापासून तनावाचे आहेत. ब्रिटिशांपासून एकाच वेळी स्वातंत्र्य मिळालेले हे देश आज 75 वर्षानंतर आर्थिक स्थितीत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. भारत एका बाजूला जगातील सर्वात वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था आहे तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान कर्जबाजारी आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशात पाकिस्तानला तब्बल ६०० अब्ज रुपयांचा खजिना सापडला आहे आणि तोही भारतातील एका नदीमुळे होय.
हिमालयात उगम पावणारी आणि पाकिस्तानमार्गे अरबी समुद्राला मिळणाऱ्या सिंधु नदीचा उल्लेख ऋग्वेदामध्ये देखील आढळतो. प्राचीन काळात सिंधु नदी संस्कृतीचे केंद्र असल्याचे संदर्भ आहेत. 3 हजार 200 किमी लांबीच्या या नदीचा समावेश जगातील सर्वात लांब नद्यांमध्ये होतो. ही नदी आपल्या पाण्याद्वारे कोट्यावधी लोकांना जगवते. आता या नदीच्या आत तब्बल 600 अब्ज रुपयांचा अनमोल असा खजिना दडला आहे.
advertisement
काश्मीरची मूळ लोकसंख्या हिंदू होती, मग ते मुस्लिम कसे झाले?
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील अटोक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंधु नदीमध्ये सोने आणि अन्य खजिना सापडतो. त्यामुळेच या परिसरात अवैध खनन जास्त होते. यावर पाकिस्तान सरकारने गेल्या वर्षी बंदी घातली होती. भूवैज्ञानिक सर्व्हेनुसार सिंधु नदीत अब्जावधी रुपयांचे सोने आहे.
पाणीपुरीवाल्याला आली ४० लाखांची GST नोटीस; UPIद्वारे पैसे घेतल्याने लागला सुगावा
पाकिस्तान सरकार आता सिंधु नदीतून सोने काढण्याच्या तयारीत आहे. या भागातील लोक मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर खाणकाम करून वाळू किंवा गोट्यांमध्ये लपलेले सोने गोळा करत आहेत.पाकिस्तान सरकारने येथे सोने काढण्यावर बंदी घातली आहे. पंजाब प्रांताच्या गृह विभागाने सांगितले की, प्लेसर गोल्ड सारख्या मौल्यवान खनिजांमुळे सरकारी तिजोरीत मोठी भर पडू शकते. हे सोने पाकिस्तानच्या उत्तरेकडील डोंगराळ भागांमधून पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे सिंधु नदीत येते आणि नदीच्या तळाशी साचते.
advertisement
सिंधु नदीत सोने कुठून येते?
हिवाळ्यात, जेव्हा सिंधु नदीचे पाणी कमी होते, तेव्हा स्थानिक लोक बेकायदेशीर पद्धतीने सोन्याचे कण गोळा करण्यासाठी येतात. आता यासाठी मोठमोठ्या यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. असे मानले जाते की सुमारे 10 कोटी ते 6 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या दोन टेक्टॉनिक प्लेट्सची धडक झाल्यामुळे हिमालयाची निर्मिती झाली आणि त्यातून सिंधु नदी निर्माण झाली.सिंधु नदीशी लागून असलेला भाग हजारो वर्षांपूर्वी सिंधु संस्कृतीचे केंद्र होते. हिमालयाच्या डोंगरांमधून सिंधु नदी सोने वाहून आणते. पाण्याच्या प्रवाहामुळे सोन्याचे कण नदीच्या काठांवर साचतात, याला प्लेसर डिपॉझिट म्हणतात.
advertisement
मुलांनो ही चूक केल्यास सर्व काही गमवाल, मोठी किंमत चुकवावी लागेल
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांत सरकारने सिंधु नदीच्या भागाचे सर्वेक्षण केले आहे. या अहवालात म्हटले आहे की, हिमालय भागातून वाहून आलेले सोने पेशावर आणि त्याच्या आसपासच्या भागांपर्यंत पोहोचते. सिंधु आणि काबुल नद्या सोन्याचे कण वाहून आणतात. हे कण विशेषतः खैबर प्रांतातील पेशावर बेसिन आणि मर्दान भागात आढळतात. हे सोन्याचे कण चपटे, गोल किंवा जवळपास गोलसर असतात. यावरून हे सिद्ध होते की सोन्याचा उगम हिमालयाच्या दुर्गम भागांमध्ये आहे.
advertisement
32.6 मेट्रिक टन सोने
पाकिस्तानी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, या सोन्याच्या साठ्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. पंजाब प्रांतातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी दिलेल्या खाणकामाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले आहे. प्रांताचे खाणकाम मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी म्हटले आहे की, अटोक भागात 32.6 मेट्रिक टन सोने आहे, ज्याची किंमत सुमारे 600 अब्ज पाकिस्तानी रुपये आहे. हे सोने 32 किमी क्षेत्रात पसरलेले आहे. मात्र, प्रांतातील अधिकाऱ्यांना वाटते की या भागातील सोन्याऐवजी दगड आणि जिंक खाणकामाला प्राधान्य द्यावे. यामुळे सोन्याचे उत्खनन गुंतागुंतीचे झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 04, 2025 7:22 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
भारतामुळे पाकिस्तानला मिळाला ६०० अब्ज रुपयांचा खजिना; हिमालयातील 32.6 मेट्रिक टन सोन्याचे रहस्य काय?