Explainer: काश्मीरची मूळ लोकसंख्या हिंदू होती, मग ते मुस्लिम कसे झाले? धर्मांतर करूनही लोक पंडित आडनाव का वापरतात?

Last Updated:

Kashmiri Pandit: शेकडो वर्षांपूर्वी काश्मीरचे मूळ रहिवासी हिंदू होते. येथील बहुसंख्य लोक हिंदू धर्मातून इस्लाममध्ये कसे आले? तसेच आजही येथील मुस्लिम त्यांच्या आडनावासोबत पंडित लिहितात? काश्मिरी लोकांची मूळ जात कोणती? काश्मिरी पंडितांचा इतिहास आहे तरी काय? जाणून घ्या तुम्हाला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे...

News18
News18
इतिहासात डोकावले तर इस्लाम येण्यापूर्वी काश्मीरची मूळ लोकसंख्या मुख्यत्वे हिंदू होती. काश्मीरमध्ये बौद्ध धर्माचा प्रभावही एका काळात खूप मोठा होता. पण ही बहुसंख्य हिंदू लोकसंख्या कशी काय मुस्लीम बनली? आणि अजूनही काश्मीरमधील काही मुस्लीम त्यांच्या नावासोबत 'पंडित' हे उपनाम का वापरतात? जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची उत्तरे...
मोहम्मद देन फौक यांनी लिहलेल्या “कश्मीर क़ौम का इतिहास” या प्रसिद्ध पुस्तकात त्यांनी पंडित शेख या प्रकरणात असे लिहिले आहे की-
“इस्लाम येण्यापूर्वी काश्मीरमध्ये सर्व लोक हिंदूच होते. त्यामध्ये हिंदू ब्राह्मणही होते, तसेच इतर जातीचे लोकसुद्धा होते. परंतु ब्राह्मणांमध्ये एक असा वर्ग होता, ज्यांचे मुख्य कार्य शिकणे आणि शिकवणे असे होते. या लोकांना 'पंडित' म्हणत.”
advertisement
मग काश्मीरची हिंदू लोकसंख्या मुस्लीम कशी बनली?
काश्मीरमधील मूळ लोकसंख्या हिंदू होती तर मग मुस्लिम कशी काय झाली? याचे उत्तर ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांमध्ये आहे. इस्लामच्या आगमनानंतर विशेषतः 14व्या शतकात, अनेक लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. सूफी संतांच्या शांततापूर्ण प्रचारामुळे आणि काही काळ धार्मिक व राजकीय दबावांमुळे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाले.
advertisement
मुस्लीम पंडित का म्हटले जाते?
मुस्लीम धर्म स्वीकारल्यानंतरही काही ब्राह्मणांनी 'पंडित' उपनाम कायम ठेवले, कारण ते त्यांच्या पूर्वजांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक होते. पंडित हे उपनाम केवळ हिंदूंमध्येच नव्हे तर मुस्लीम समाजामध्येही त्यांच्या विद्वत्तेचा आणि सन्मानाचा दाखला देण्यासाठी वापरले जाते.
मोहम्मद देन फौक लिहितात, इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर या समूहाने पंडित हे उपनाम अभिमानाने कायम ठेवले. त्यामुळे हा समूह मुसलमान असूनही आजही पंडित म्हणून ओळखला जातो. त्यांना 'शेख' असेही म्हटले जाते. सन्मानाने त्यांना 'ख्वाजा' असेही संबोधले जाते. मुसलमान पंडितांची मोठी लोकसंख्या ग्रामीण भागांमध्ये आहे.
advertisement
१ जानेवारीला आपण नवीन वर्ष का साजरे करतो? या देशात ५ वेळा साजरा होतो नववर्ष
काश्मीरमध्ये मुसलमान पंडितांची लोकसंख्या सुमारे 50 हजाराच्या आसपास असेल. हे असे मुसलमान आहेत ज्यांनी इस्लाम स्वीकारला आहे. हे काश्मीरचे मूळ रहिवासी आहेत, बाहेरून आलेले नाहीत. पुस्तकानुसार, खरे काश्मीरी हेच पंडित आहेत. काश्मीरमध्ये अशा प्रकारच्या इतर अनेक मुस्लीम जमातीही आहेत.
advertisement
बट, भट, लोन आणि गनी हेही कधी हिंदू पंडित होते
त्याचप्रमाणे अनेक मुसलमान त्यांच्या उपनामात 'भट' किंवा 'बट' लिहितात. यामागे एक कथा आहे. हे ते लोक आहेत ज्यांनी पूर्वी धर्म बदलला आणि हिंदूंकडून मुसलमान बनले. पंडितदेखील 'बट' लिहितात. ज्यांनी मुसलमान धर्म स्वीकारल्यानंतर 'पंडित' जोडले. ते इस्लाम स्वीकारण्यापूर्वी ब्राह्मण समाजातील एक उच्च वर्ग होता.
advertisement
काश्मीरची मूळ जात कोण ?
इतिहास आणि संशोधनात्मक पुस्तकांनुसार, काश्मीरची मूळ जात पंडित नव्हती, तर जैन होते आणि त्यानंतर बौद्ध धर्माचे होते. नंतर तिथे पंडितांचा प्रभाव वाढला. पुढे, जे पंडित मुसलमान झाले त्यांनी 'पंडित' हे उपनाम ठेवले. यावर हिंदू पंडित आणि मुसलमान दोघांनाही आक्षेप नव्हता. त्यामुळे काश्मीरमध्ये मुसलमान पंडित नावाचा एक समूह तयार झाला.
advertisement
काश्मिरी पंडितांचा इतिहास
काश्मिरी पंडित हे मुख्यतः काश्मिरी ब्राह्मण म्हणून ओळखले जात. ते काश्मिरी हिंदूंच्या एका गटाचा भाग होते. जो मुख्यतः सरस्वत ब्राह्मणांशी संबंधित होता. ते काश्मीर खोऱ्यातील पाच गौडा ब्राह्मण समूहांशी जोडलेले होते.
मध्ययुगात विशेषतः 14व्या शतकात, इस्लामचा काश्मीरमध्ये मोठा प्रभाव पडला. यामुळे अनेकांनी धर्मांतर केले.तिसऱ्या शतकात काश्मिरी हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्म स्वीकारला. आठव्या शतकात तुर्की आणि अरब आक्रमण वाढले परंतु पर्वतांमुळे काश्मीर खोऱ्यावर त्यांचा फारसा प्रभाव पडला नाही. त्यांना या भागात जाणे थोडे अवघड वाटले. 14व्या शतकात मात्र काश्मीरमध्ये मुस्लीम राजवट प्रस्थापित झाली. याची अनेक कारणे होती. वारंवार होणारे हल्ले, अंतर्गत या गोष्टींचा यात समावेश होता.
त्याचवेळी येथील शासक देखील कमकुवत होते. खुद्द लोहारा ब्राह्मण हिंदू राजघराण्यावर खुश नव्हेत.
शेवटच्या राजा सुखदेवने ब्राह्मणांवर कर लावला होता, ज्यामुळे तेही नाराज झाले.
14व्या शतकात सुलतान सिकंदर बुतशिकनने हिंदूंना मोठ्या प्रमाणावर काश्मीर सोडण्यास भाग पाडले. काही लोकांनी मुसलमान धर्म स्वीकारला, तर काही काश्मीरमधून पलायन केले. त्याचा उत्तराधिकारी हिंदूंसाठी तुलनेने उदार होता.
पंडितांशिवाय काश्मीच्या संस्कृतीचा विचार देखील करता येणार नाही. काश्मीरच्या इतिहासाचे, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलाचे ते वाहक आणि साक्षीदार आहेत.
बनवासी काश्मीरी पंडित- हे पंडित आहेत मुस्लिम राजांच्या दबावमुळे देशातील दुसऱ्या भागात स्थलांतर केले. ज्यातील अनेक जण पुन्हा काश्मीरमध्ये परत आले. त्यांना बनवासी काश्मीरी पंडित म्हटले जाते.
मलमासी पंडित- हे असे पंडित आहे जे मुस्लीम राजांच्या दबावापुढे झुकले नाहीत. आणि तेथेच थांबून लढा दिला.
बुहिर काश्मिरी पंडित- हे काश्मिरी पंडित आहे जे व्यापर करतात.
मुस्लिम काश्मिरी पंडीत- हे काश्मिरी पंडित आहेत जे सुरुवातीला हिंदू होते पण नंतर मुस्लिम झाले. मात्र पंडित आडनाव वापरतात. हे लोक त्यांच्या नावासोबत भट, बट, धार, दार, लोन, मंटू, मिंटू, गणी, तंत्रे, मट्टू, पंडित, राजगुरू, राथेर, राझदान, मगरे, यटू, वाणी अशी जातीची नावे जोडतात.
काश्मीरचा प्रवास....
1. प्राचीन काळातील काश्मीर
– काश्मीर वैदिक काळात हिंदू धर्माचे एक महत्त्वाचे केंद्र होते.
– नीलमत पुराण आणि राजतरंगिणी यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये काश्मीरच्या हिंदू राजे आणि धार्मिक परंपरांचा उल्लेख आढळतो.
– काश्मीरमध्ये शिवपूजा (विशेषतः शैव परंपरा) आणि वैष्णव परंपरांचा मोठा प्रभाव होता. कश्मीरी शैव दर्शन भारतातील एक महत्त्वाचे दार्शनिक केंद्र होते.
2. बौद्ध धर्माचा उदय
– सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धर्माने काश्मीरमध्ये आपला प्रभाव प्रस्थापित केला.
– काश्मीर हे बौद्ध विद्वान आणि विद्यापीठांचे केंद्र बनले. येथून बौद्ध धर्म आशियातील इतर भागांमध्ये पसरवला गेला.
3. इस्लामचे आगमन
– 13व्या शतकानंतर इस्लामचा काश्मीरमध्ये प्रवेश झाला.
– सैय्यद आणि सूफी संत, विशेषतः मीर सैय्यद अली हमदानी यांसारख्या व्यक्तींनी इस्लामच्या प्रचारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
– हळूहळू, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
Explainer: काश्मीरची मूळ लोकसंख्या हिंदू होती, मग ते मुस्लिम कसे झाले? धर्मांतर करूनही लोक पंडित आडनाव का वापरतात?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement