वनविभागाच्या सहकाऱ्याने पॅरामोटरिंग सुरू
चिखलदरा येथे सुरू करण्यात आलेल्या पॅरामोटरिंगबाबत माहिती देताना पायलट आशिष तोमर सांगतात की, पावसाळा सुरू झाला की, चिखलदरा नैसर्गिक सौंदर्याने बहरून जातं. काही दिवसातच पर्यटकांची गर्दी याठिकाणी बघायला मिळते. चिखलदरा येथे येत असताना तो वळणदार रस्ता, पाण्याचे झरे, वरून पडणारा पाऊस यातूनच पर्यटकांना भरपूर आनंद मिळतो.
advertisement
तरीही चिखलदरा येथे पर्यटकांसाठी दरवर्षी नवनवीन गोष्टींची सुविधा केली जात आहे. भीमकुंड येथे साहसी पर्यटकांसाठी स्काय सायकलिंग सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर आता वनविभागाच्या सहकाऱ्याने चिखलदरा येथे पर्यटकांना आकर्षण असणाऱ्या पॅरामोटरिंगची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
पॅरामोटरिंग पायलटला 4 वर्ष कामाचा अनुभव
चिखलदरा येथे अनेक साहसी पर्यटक भेट देतात. पॅरामोटरिंगमुळे आता त्यांना भीमकुंड येथील खोल दऱ्या, गाविलगड किल्ला, चिखलदरा शहर आणि मेळघाटचे जंगल हे सर्व उंच आकाशातून बघायला मिळणार आहे. वन विभागाने चिखलदरा येथे पॅरामोटरिंगची सुविधा सुरू केली आहे. याआधी मी पॅरामोटरिंग पायलटचे दोन वर्ष प्रशिक्षण घेतले आहे.
मी मूळचा परतवाडा येथील आहे. पाँडिचेरी, जैसलमेर, हरिद्वार, अलिबाग आणि गोवा याठिकाणी पॅरामोटरिंग पायलट म्हणून काम करण्याचा चार वर्षाचा अनुभव माझ्याकडे आहे. त्यामुळे चिखलदरा येथील पॅरामोटरिंग सुरक्षित असणार आहे. चिखलदरा येथील नैसर्गिक सौंदर्य आकाशातून बघता येणार असल्याने साहसी पर्यटकांच्या आनंदात आता भर पडली आहे, असेही त्यांनी सांगितले.