TRENDING:

Pune Tourism: अवघ्या 500 रुपयांत करा पुण्याचं पर्यटन, PMP ची खास बससेवा, 13 मार्ग कोणते?

Last Updated:

Pune Tourism: पुणे शहरासह बाहेरून पर्यटनाला येणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पीएमपीने 13 पर्यटन मार्गांवर खास बससेवा सुरू केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आता अधिक सोप्या आणि सुखद मार्गाने पाहता येणार आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) तर्फे पर्यटकांसाठी विशेष इलेक्ट्रिक व वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात आली आहे. आठवड्याच्या शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या बस शहर व जिल्ह्यातील 13 प्रमुख पर्यटन मार्गांवर धावणार आहेत.
Pune Tourism: अवघ्या 500 रुपयांत करा पुण्याचं पर्यटन, PMP ची खास बससेवा, 13 मार्ग कोणते?
Pune Tourism: अवघ्या 500 रुपयांत करा पुण्याचं पर्यटन, PMP ची खास बससेवा, 13 मार्ग कोणते?
advertisement

राज्यभरातून तसेच परदेशातून अनेक पर्यटक पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्ले, घाटमाथ्यावरील नैसर्गिक स्थळे, प्रसिद्ध देवस्थाने आणि संग्रहालये पाहण्यासाठी येतात. मात्र, यासाठी खासगी वाहनांची गरज भासते, ज्यामुळे खर्च वाढतो आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे मनस्तापही होतो. या पार्श्वभूमीवर पीएमपीकडून सुरू करण्यात आलेली ही पर्यटन बससेवा प्रवाशांसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारी, सुरक्षित आणि माहितीपूर्ण ठरणार आहे.

Cancer Vaccine: लक्ष द्या! मुलींना मिळणार मोफत कर्करोग प्रतिबंधक लस, कधी आणि कुठं? संपूर्ण माहिती

advertisement

या बस सेवा पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित आहेत. पर्यटकांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी स्मार्ट बसची निवड करण्यात आली आहे. प्रति प्रवास 500 रुपये इतका माफक तिकिटदर ठेवण्यात आला असून, यात प्रत्येक पर्यटनस्थळावर मार्गदर्शन व थांबा व्यवस्था आहे.

पुणे आणि जिल्ह्यातील विविध दिशांना ही बससेवा उपलब्ध आहे.

मार्ग क्र. 1 मध्ये हडपसर ते मोरगाव, जेजुरी, सासवड आणि इस्कॉन मंदिरपर्यंतची यात्रा समाविष्ट आहे.

advertisement

मार्ग क्र. 2 हडपसर, सासवड, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, हडपसर

मार्ग क्र. 3 मध्ये पुणे स्टेशनपासून शिवसृष्टी, स्वामी नारायण मंदिर, तुकाईमाता मंदिर आणि बनेश्वर मंदिरापर्यंतचा प्रवास होईल.

मार्ग क्र. 4 मध्ये टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा आणि झपूर्झा संग्रहालयाचा समावेश आहे.

मार्ग क्र. 5 : पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, गोकुळ फ्लॉवर पार्क गोळेवाडी, पुणे स्टेशन

advertisement

मार्ग क्र. 6 : पुणे स्टेशन, पूलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणे स्टेशन

मार्ग क्र. 7 : पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर, बाडेबोल्हाई, छत्रपती संभाजी महाराज समाधीमंदिर, रांजणगाव गणपती, पुणे स्टेशन

मार्ग क्र. 8 : भक्ती-शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर, मोरया गोसावी मंदिर, प्रतिशिर्डी, देहूगाव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती-शक्ती निगडी

advertisement

मार्ग क्र. 9: स्वारगेट, पौडगाव, श्री सत्य साईबाबा महाराज स्मारक, चिन्मय विभूतीयोग साधना ध्यान केंद्र, स्वारगेट

मार्ग क्र. 10: स्वारगेट, भोसरी, क्रांतीवीर हुतात्मा राजगुरू स्मारक, श्री क्षेत्र खंडोबा मंदिर निमगाव दावडी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळ, स्वारगेट

मार्ग क्र. 11: स्वारगेट, डेक्कन जिमखाना, एकविरादेवी मंदिर, कार्ला लेणी, लोणावळा, मनशक्ती ध्यान केंद्र, व्हॅक्स म्युझियम, स्वारगेट

मार्ग क्र. 12: पुणे स्टेशन, श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर पुरंदर, श्री प्रति क्षेत्र त्रिंबकेश्वर मंदिर हिवरे, श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिर सासवड, श्री क्षेत्र नारायणेश्वर मंदिर, श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर, पुणे स्टेशन

मार्ग क्र. 13: (1) पुणे स्टेशन, तळजाई माता मंदिर, पद्मावती मंदिर, तुकाई माता मंदिर, श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी मंदिर, यमाई माता मंदिर, पुणे स्टेशन

(2) पुणे स्टेशन, महालक्ष्मी माता मंदिर, तांबडी जोगेश्वरी मंदिर, चतु:शृंगी मंदिर, पुणे स्टेशन

मार्ग क्रमांक 12 आणि 13 हे श्रावण आणि नवरात्रीत सुरू राहतील. तर इतर मार्गांत खडकवासला, पानशेत, रामदरा, थेऊर गणपती, रांजणगाव गणपती, आळंदी, देहू, लोणावळा, कार्ला लेणी यांचाही समावेश आहे.

पुणे आणि जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पीएमपीची ही संकल्पना महत्त्वपूर्ण मानली जात आहे. इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषण नियंत्रणासही मदत होणार असून, हरित पर्यटनाच्या दिशेने हा उपक्रम एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

पर्यटकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि परवडणारी सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुणे आणि परिसरातील समृद्ध वारसा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे पीएमपीएमएल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Pune Tourism: अवघ्या 500 रुपयांत करा पुण्याचं पर्यटन, PMP ची खास बससेवा, 13 मार्ग कोणते?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल