पुण्यात मेट्रो, उड्डाणपूल आणि अन्य सरकारी आणि खासगी बांधकाम प्रकल्पांच्या गतीवर निर्बंधांचा परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले की, या चार दिवसांचा अनुभव लक्षात घेऊनच पुढील धोरणात्मक निर्णय घेतला जाईल.
Pune Weather: पुढील 24 तास धोक्याचे, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट
advertisement
रेड झोनमध्ये मात्र निर्बंध कायम
शहरातील मध्यवर्ती भागातील काही रस्ते रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत जड वाहनांना प्रवेश निषिद्ध आहे.
या झोनमध्ये खालील प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे
नगर रस्ता, जुना मुंबई-पुणे महामार्ग (पाटील इस्टेट ते अभियांत्रिकी महाविद्यालय), गणेशखिंड मार्ग (ब्रेमेन चौक ते विद्यापीठ चौक), औंध-वाकड मार्ग (परिहार चौक ते महादजी शिंदे पूल), बाणेर रस्ता (राधा चौक ते विद्यापीठ चौक), पाषाण-सूस रस्ता, पौड रस्ता, कर्वे रस्ता/डीपी रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, कोंढवा रस्ता समावेश आहे.
कोणते बदल करण्यात आले आहेत?
शनिवार – 19 आणि 26 जुलै
जड वाहनांना सायंकाळी 4 ते रात्री 10 वगळता उर्वरित वेळेत वाहतूक करण्याची परवानगी
रविवार – 20 आणि 27 जुलै
बांधकाम क्षेत्राशी संबंधित जड वाहनांना संपूर्ण दिवस वाहतुकीस परवानगी
या निर्णयामुळे शहरातील मोठ्या प्रकल्पांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रयोगाच्या यशस्वीतेनुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे.