एसटीकडून श्रावण महिन्यात खास तीर्थाटन योजना राबवण्यात येतेय. या अंतर्गत राज्याच्या विविध भागांतून एसटी बसने भाविकांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटन करता येईल. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात प्रवास उपलब्ध असणार आहे. तर अमृत ज्येष्ठ योजनेतून वयोवृद्धांना मोफत प्रवासाची सोय मिळणार आहे.
सरकारी नोकरी लागलेल्या तरुणाईच्या हस्ते वृक्षारोपण, धाराशिवमधील हा अनोखा उपक्रम काय?, VIDEO
advertisement
दरम्यान, देशभरातील शिवभक्त नाशिक जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरला येत आहेत. त्र्यंबकेश्वरला आलेले भाविक शिर्डी आणि सप्तशृंगी गडावरही हजेरी लावतात. एसटीचा उपक्रम असला तरी भाविकांमुळे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बाजारपेठाही फुललेल्या आहेत. तेसेच तेथील व्यापाऱ्यांनाही चांगले दिवस आल्याचे चित्र आहे.
कोणत्या आगारातून व्यवस्था
एसटी संगे तीर्थाटन योजनेतून राज्यातील विविध आगारातून बससेवा उपलब्ध आहे. नाशिकमधील जुन्या सीबीएस स्थानकातून त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत. महामार्ग स्थानक येथून शिर्डीला जाण्यासाठी महामंडळाच्या बस ठरलेल्या वेळेत उपलब्ध असणार आहेत. श्रावण महिन्यामुळे त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी जादा बसचीही सोय करण्यात आलीये.