बससेवा कधी सुरू राहील?
आठवड्याचा प्रत्येक शनिवार आणि रविवार त्याचबरोबर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही बससेवा सुरू असणार आहे. या बसचा तिकीट दर प्रत्येकी 500 रुपये असा असून ही बस सकाळी ठरलेल्या स्थानकावरून सुटणार आहे.
मध्य रेल्वेवरचा प्रवास होणार आणखी गारेगार, 14 नव्या AC लोकल धावणार, पाहा वेळापत्रक
कोणकोणत्या मार्गावरून बससेवा सुरू असेल?
advertisement
मार्ग क्रमांक एक हडपसर, स्वारगेट, इस्कॉन मंदिर, मोरगाव गणपती, जेजुरी दर्शन, सासवड, स्वारगेट, हडपसर हे असेल. तर दुसरा मार्ग हडपसर, स्वारगेट, सासवड, नारायणपूर, श्रीक्षेत्र म्हस्कोबा मंदिर हा असेल.
मार्ग क्रमांक तीन पुणे स्टेशन, डेक्कन जिमखाना, स्वारगेट, शिवसृष्टी आबेगाव, स्वामी नारायण मंदिर नन्हे, कोंढणपूर तुकाईमाता मंदिर, बनेश्वर मंदिर, अभयारण्य, बालाजी मंदिर केतकावळे, स्वारगेट हा असेल. मार्ग क्रमांक चार पुणे स्टेशन, डेक्कन जिमखाना, पु, ल. देशपांडे गार्डन, खारावडे म्हसोबा देवस्थान, नीळकंठेश्वर पायथा, घोटावडे फाटामार्गे, डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन हा असेल.
मार्ग क्रमांक पाच पुणे स्टेशन, डेक्कन जिमखाना, खडकवासला धरण, सिंहगड पायथा, गोकुळ फ्लॉवर पार्क गोळेवाडी, पाणशेत धरण हा असेल. मार्ग क्रमांक सहा पुणे स्टेशन, स्वारगेट, हडपसर रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम हडपसर, स्वारगेट, पुणे स्टेशन हा असेल.
मार्ग क्रमांक सात पुणे स्टेशन, स्वारगेट, वाघेश्वर मंदिर, तुळापूर त्रिवेणी संगम, रांजणगाव गणपती, भीमा कोरेगाव विजय स्तंभ, पुणे स्टेशन हा असेल. मार्ग क्रमांक आठ पुणे स्टेशन, स्वारगेट, इस्कॉन मंदिर रावेत, मोरया गोसावी मंदिर, प्रतिशिर्डी शिरगाव, देहूगाव, भंडारा डोंगर पायथा, स्वारगेट, पुणे स्टेशन हा असेल.
मार्ग क्रमांक नऊ स्वारगेट, पौडगावमार्गे सत्य साईबाबा महाराज आश्रम, चिन्मय विभूतीयोग साधना ध्यान केंद्र कोळवण, स्वारगेट हा असेल. मार्ग क्रमांक दहा स्वारगेट, भोसरी, चाकण, क्रांतिवीर हुतात्मा राजगुरू स्मारक, सिद्धेश्वर मंदिर राजगुरूनगर, श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर निमगाव दावडी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळ हा असेल.
बुकिंग कुठे करायची?
डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी, मनपा भवन पास केंद्रांवर तुम्ही बुकिंग करू शकता. बसच्या सीट लिमिटनुसार पूर्ण 33 प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास 5 प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये 100 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची देखील माहिती प्रशासनाने दिली आहे.