TRENDING:

Special Train: उत्तरेतील प्रवाशांना रेल्वेचे मोठे गिफ्ट, जालन्यातून धावणार विशेष रेल्वे गाडी, पाहा वेळापत्रक

Last Updated:

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये रोजगारानिमित्त उत्तर भारतातील असंख्य लोक राहतात. 27 ऑगस्टपासून ही ट्रेन सुरू होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये रोजगारानिमित्त उत्तर भारतातील असंख्य लोक राहतात. सध्या सण-उत्सवाचा काळ सुरू असल्याने उत्तर भारतातील प्रवाशांच्या सोयीसाठी जालना ते छपरा विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. 27 ऑगस्टपासून ही ट्रेन सुरू होत आहे.
जालना
जालना
advertisement

गेल्या महिनाभरापासून बंद असलेली जालना-छपरा स्पेशल रेल्वे 27 ऑगस्टपासून पुन्हा धावणार आहे. रेल्वे बोर्डाने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. ही स्पेशल रेल्वे 26 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ही रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला अनेक निवेदने देण्यात आली होती, तसेच आंदोलनही करण्यात आले होते.

Vande Bharat Express: मुंबई-नांदेड प्रवास सुस्साट! 610 किमी अंतर होणार 9 तासांत पार

advertisement

जालना, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यांतील मोठ्या संख्येने नागरिक रोजगारासाठी राहतात. दिवाळी, छठ पूजा, होळी यांसारख्या सणांदरम्यान ते आपल्या गावी जातात. जालना किंवा छत्रपती संभाजीनगर येथून थेट रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांना मनमाड किंवा जळगाव येथून रेल्वेने जावे लागते. जालना ते छपरा रेल्वेमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

View More

स्पेशलचा दर्जा कायम

advertisement

जालना-छपरा रेल्वे स्पेशल असल्यामुळे तिचे तिकीट भाडे 30 टक्के जास्त आहे. तरीही ही रेल्वे नेहमी पूर्ण क्षमतेने भरलेली असते. ही रेल्वे लोकप्रिय असूनही अद्याप नियमित करण्यात आलेली नाही किंवा तिची वारंवारताही वाढवण्यात आलेली नाही.

दर बुधवारी सुटणार

जालना ते छपरा रेल्वे दर बुधवारी जालना रेल्वे स्थानकावरून रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी सुटेल. परतीच्या प्रवासात शुक्रवारी रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी छपरा रेल्वे स्थानकावरून सुटेल. या गाडीला 24 डबे असतील.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Special Train: उत्तरेतील प्रवाशांना रेल्वेचे मोठे गिफ्ट, जालन्यातून धावणार विशेष रेल्वे गाडी, पाहा वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल