सांगली : सांगलीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने केलेल्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, तासगाव, विटा परिसरातील प्रवाशांना मथुरा, आग्रा, ऋषिकेश, हरिद्वारला जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. सांगली स्थानकावरूनही येथील प्रवाशांना यात्रा करता येणार आहे.
सांगली स्थानकावरून ऋषिकेश-हरिद्वार गाडीची एसी स्लीपर आणि स्लीपर क्लास तिकिटे उपलब्ध झाली आहेत. 7 जानेवारी, 11 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी, 4 मार्च या दिवशी ही गाडी क्रमांक 07363 उपलब्ध होणार आहे. सांगली रेल्वे स्थानकावरून सोमवारी रात्रीची महालक्ष्मी एक्सप्रेस गेल्यानंतर मंगळवारी पहाटे 3:15 वाजता ही गाडी सुटणार आहे.
advertisement
मिरजेतून कुंभमेळ्यासाठी जाण्याची सोय, जयनगर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार
असा असेल मार्ग
सांगली स्टेशनवरून सुटून पुणे, दौंड, नगर, कापरगाव, मनमाड, भुसावळ, ईटारसी, भोपाळ, बिना, झांसी, ग्वाल्हेर, आग्रा, मथुरा, दिल्ली (निजामुदीन), गाझियाबाद, मेरठ, मुझफ्फरनगर, देवबंद, टपरी, रुडकी येथे थांबून गुरूवारी रात्री 10 वाजता हरिद्वारला तर रात्री 11:30 वाजता ऋषिकेशला पोहोचेल.
गाडीला भरपूर मागणी असल्याने प्रवाशांनी तिकिटे सांगली स्थानकातून किंवा आयआरसीटीसी संकेत स्थळावरून बुक करावित. बोर्डिंग स्टेशन सांगली टाकावे, असे आवाहन नागरिक जागृती मंचने केले आहे.






