TRENDING:

Monsoon Tourism : पावसाळ्यात लोणावळा, खंडाळा विसरा, फिरण्यासाठी छ. संभाजीनगरमधील टॅाप 5 ठिकाणं!

Last Updated:

पावसाळ्यात फिरण्यासाठी पर्यटक लोणावळा, खंडाळा यांसारख्या ठिकाणी जात असतात. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशाच काही प्रमुख टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात फिरण्यासाठी पर्यटक लोणावळा, खंडाळा यांसारख्या ठिकाणी जात असतात. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशाच काही प्रमुख टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्या फिरण्यासाठी किंवा ट्रेकिंगला जाण्यासाठी आहेत. त्यापैकीच गोगाबाबा टेकडी, हनुमान टेकडी, देवगिरी किल्ला अशा डोंगरांवर फिरता येते. तसेच या सर्व टेकड्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
advertisement

सर्वप्रथम गोगा बाबा टेकडी ही छत्रपती संभाजीनगरमधील एक टेकडी आहे. या ठिकाणाहून दिसणारे निसर्गरम्य दृश्य अतिशय नयनरम्य आहे. येथे शांत वातावरण आणि नितांत नैसर्गिक वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. गोगा बाबा टेकडीवरून सूर्यास्ताचे दृश्य पाहण्यासारखे आहे. गोगा बाबा टेकडीवर एक छोटेसे मंदिर आहे जिथे पोहोचल्यानंतर लोक भेट देऊ शकतात. गोगा बाबा टेकडीच्या माथ्यावर जाण्यासाठी 30 ते 40 मिनिटे लागतात. विशेष म्हणजे पावसाळा आला की हा डोंगर एकदम हिरवागार झाल्याचं पाहायला मिळतो.

advertisement

Bhimkund Waterfall: धुकं, पाऊस आणि धबधबा, असा अनुभव तुम्ही घेतला नसेल, VIDEO

गोगाबाबा टेकडीच्या माथ्यावर पोहोचल्यावर पर्यटकांना या ठिकाणाहून संपूर्ण शहराचे आकर्षित करणारे दृश्य पाहायला मिळते. शिखरावरून देवगिरी किल्ला, हनुमान टेकडी, बीबी का मकबरा, पाहायला मिळतो. त्यामुळे पर्यटक वरून संपूर्ण शहराचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपू शकतात. संध्याकाळी इथलं वातावरण आणखीनच शांत होतं. याशिवाय पर्यटकांना गोगा बाबा टेकडीवरून संध्याकाळी दिसणारा सूर्यास्त त्यांच्या कॅमेऱ्यात आठवण म्हणून ठेवता येईल.

advertisement

View More

दौलताबाद किल्ला डोंगरावर वसलेला असून त्याची रचना नैसर्गिक डोंगराला कापून केलेली आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी साधारण 1 ते दीड तास लागतो. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात, काही ठिकाणी अरुंद आणि खडतर पायऱ्या आहेत. सकाळी लवकर गेल्यास संपूर्ण परिसर फिरता येतो. पावसाळ्यात डोंगर हिरवागार दिसतो.

छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमान टेकडी एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. या टेकडीवर हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे, जे भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे. याशिवाय, टेकडीवरून शहराचे संपूर्ण दृश्य देखील पाहायला मिळते. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, यामुळे नागरिक येथे फिरायला आणि ट्रेकिंगसाठी येत असतात.

advertisement

छत्रपती संभाजीनगरहून 30 किलोमीटर अंतरावर दत्तात्रयाचे साक्षात्कार झालेले निसर्गरम्य सुलीभंजन दत्तधाम ठिकाण आहे. हे ठिकाण फार कमी लोकांना माहिती आहे. धार्मिक आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून सुलीभंजन प्रसिद्ध आहे. दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याच्या उत्तरेस सुलीभंजन हे छोटेसे गाव आहे. खुलताबादपासून पाच किलोमीटर अंतरावर श्री. दत्तधाम सूर्यकुंड व चंद्रकुंड पर्वत आहे.

श्रीदत्त मंदिराजवळील टेकडीच्या माथ्यावर दोन गरम पाण्याचे झरे आहेत. मंदिराच्या बाहेर धातूच्या घंटाचा आवाज काढणारा एक दगड देखील दिसतो. हे ठिकाण ध्यानासाठी महत्त्वाचे मानले जाते. म्हैसमाळ हिल स्टेशन देखील काही अंतरावर दिसते. छत्रपती संभाजीनगर - नाशिक महामार्ग टेकडीच्या पायथ्याशी दिसतो. प्रादेशिक वन्यजीव मुबलक प्रमाणात आढळतात. मोर सकाळी आणि संध्याकाळी रस्त्याच्या कडेला फिरायला जाताना या ठिकाणी पहायला मिळतात, पावसाळ्यात ढग आणि धुक्याचे एकत्रीकरण मनमोहक असते. मंदिराजवळील दृश्य बिंदूवर असल्यास खाली ढग तयार होताना दिसतात. संपूर्ण भूभागावर छोटे छोटे धबधबे दिसतात. ऑगस्ट-सप्टेंबर आणि मार्च-एप्रिल या काळात शेजारच्या ठिकाणांहून बरेच लोक या ठिकाणी येतात.

advertisement

म्हैसमाळ हे महाराष्ट्रातील थंड हवेचे सुंदर ठिकाण आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळ हे स्थित आहे आणि डोंगराळ प्रदेशात वसलेले आहे. येथे महेश गिरी मंदिर नावाचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. तसेच, पर्यटकांसाठी अनेक व्ह्यूपॉइंट्स आहेत या ठिकाणाहून निसर्गाचा आनंद घेता येतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Monsoon Tourism : पावसाळ्यात लोणावळा, खंडाळा विसरा, फिरण्यासाठी छ. संभाजीनगरमधील टॅाप 5 ठिकाणं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल