Bhimkund Waterfall: धुकं, पाऊस आणि धबधबा, असा अनुभव तुम्ही घेतला नसेल, VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पावसाळ्यात पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी चिखलदरा येथे येतात. येथील एक पवित्र आणि आकर्षक असलेले ठिकाण म्हणजे भीमकुंड. भीमकुंड येथील धबधबा हा पर्यटकांचे आकर्षण ठरतो.
अमरावती: पावसाळ्यात जर अमरावती जिल्ह्यांत एखाद्या पर्यटन स्थळी जायचं असेल, तर सर्वात आधी आठवतं ते म्हणजे मेळघाटमधील चिखलदरा. चिखलदरा येथील पांढरे शुभ्र धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी चिखलदरा येथे येतात. येथील एक पवित्र आणि आकर्षक असलेले ठिकाण म्हणजे भीमकुंड. भीमकुंड येथील धबधबा हा पर्यटकांचे आकर्षण ठरतो. चांगला पाऊस झाल्यानंतर या धबधब्याचे दृश्य प्रत्येकाला आकर्षित करते.
चिखलदरा येथील आकर्षण भीमकुंड
चिखलदरा येथून परतवाडा मार्गावर भीमकुंड हे पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी अनेक छोटे मोठे धबधबे उंच डोंगरावरून खोल दरीत कोसळताना दिसतात. हेच धबधबे बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. जून, जुलै आणि ऑगस्ट हे तीन महिने येथील परिसर अतिशय आकर्षक दिसत असल्याचं पर्यटक सांगतात. अनेकदा हा धबधबा धुक्यांच्या आड जातो. तेव्हाचे दृश्य तर आणखीनच छान दिसत असल्याचं येथील पर्यटक सांगतात. सकाळी चार ते पाच वाजताच्या दरम्यान येथील दृश्य बघण्यात एक वेगळीच मज्जा आहे. विदर्भातील पर्यटक पावसाळ्यात एकदा तरी चिखलदरा येथे जाऊन येतात. येथील नयनरम्य दृश्य बघण्याकरिता तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता.
advertisement
भीमकुंडाची आख्यायिका काय?
चिखलदरा परिसरात पवित्र आणि आकर्षक असे स्थळ आहे, ज्याला भीमकुंड असे म्हणतात. चिखलदऱ्यापासून हे ठिकाण फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. भीमकुंडचा उल्लेख महाभारतातील कथांमध्ये देखील झालेला दिसून येतो. या भीमकुंडाबाबत अशी आख्यायिका आहे की, पांडव अज्ञातवासात असताना भीमाने किचक नावाच्या बलाढ्य राक्षसाचा वध केला होता. किचक द्रौपदीचा छळ करीत असल्याने भीमाने त्याला ठार मारले.
advertisement
या घटनेनंतर भीमाने आपले हात ज्या कुंडात धुतले त्याला भीमकुंड असे नाव देण्यात आले, अशी तेथील आख्यायिका आहे. या घटनेमुळे या ठिकाणाला किचकदरा असेही म्हटले जाते, कारण जिथे किचकाचा वध झाला होता, अशी माहिती तेथील नागरिक देतात. हे सर्व पावित्र्य तर या ठिकाणचे आहेच, पण पावसाळ्यात निसर्ग सौंदर्यासाठी देखील हे स्थळ अतिशय प्रसिद्ध आहे.
advertisement
स्काय सायकलिंग आणि पॅरामोटरिंगसाठी प्रसिद्ध
view commentsचिखलदऱ्याला फिरायला गेल्यानंतर भीमकुंड या परिसरात तुम्ही गेले असता, त्याठिकाणी तुम्हाला स्काय सायकलिंगचा आनंद सुद्धा घेता येऊ शकतो. ॲडव्हेंचर पार्क म्हणून एक पॉइंट भीमकुंड येथे आहे. दरीच्या या काठावरून त्या काठावर स्काय सायकलिंगच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता. तसेच पॅरामोटरिंग देखील त्याठिकाणी सुरू करण्यात आली आहे. साहसी पर्यटकांसाठी आता नवनवीन सुविधा याठिकाणी आहेत.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
August 20, 2025 5:12 PM IST

