शहरातून पर्यटन स्थळी जायचे कसे?
तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर किंवा सिडको बस स्थानकावर आहात, बाहेर आल्यानंतर गेटच्या ठिकाणाहून सिटी बस किंवा ऑटोरिक्षा लागतात, येथून तुम्ही मध्यवर्ती बस स्थानक आणि बाबा पेट्रोल पंप येथे जाऊ शकता. या दोन्ही ठिकाणाहून सर्व पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी खाजगी गाड्या आणि सिटी बस, तसेच साधारण बस देखील मिळतात. दौलताबाद, वेरूळ, खुलताबाद हे पर्यटन स्थळे एकाच रुटला असल्यामुळे सर्व ठिकाणी जाणे सोपे होते.
advertisement
Shevga Farming: घरची गरिबी, छपराचं घर, नववीतून सोडली शाळा अन् लावला शेवगा, आज करोडपती!
छत्रपती संभाजीनगर ते वेरूळ अंतर 40 ते 42 कि.मी. इतके आहे. यासाठी तुम्हाला सर्वसाधारणपणे 100 ते 150 रुपये जाण्यासाठी लागतात. एसी बस किंवा एसी गाड्यांमध्ये जायचे झाल्यास त्याचा खर्च 250 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तसेच अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगरहून 100 कि.मी आहे व ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्ध आहे. दौलताबाद किल्ला असो, वेरूळ लेणी, किंवा अजिंठा लेणी येथे गेल्यानंतर लेण्या आणि किल्ला पाहण्यासाठी पर्यटन विभागाकडून काही मोजकी रक्कम तिकिटासाठी पर्यटकांकडून आकारली जाते.
दौलताबाद किल्ल्यात काय पहाल?
तुम्ही दौलताबाद किल्ल्यात महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला दिसणारा चांदमिनार हा 64 मीटर उंच मनोरा शैलीत बांधलेला आहे. तसेच हा चांदमिनार विजयाचे प्रतीक मानला जातो. तसेच किल्ल्यामध्ये अनेक तोफा आहेत, त्यापैकी मेंढा तोफ आणि दुर्गा तोफ ह्या प्रमुख आहेत. या तोफा त्यांच्या आकारामुळे पाहण्यासारख्या आहेत. तसेच या किल्ल्यात 180 स्तंभांचे हेमाडपंती असलेले भारत माता मंदिर आहे, एक हत्ती हौद, दगडी गुहा, बुलंद दरवाजे आणि भूलभुलैया भुयारी मार्ग देखील आहे. तसेच या किल्ल्यात विविध देवतांची मंदिरे पाहायला मिळतात.
वेरूळ लेणी येथे काय पहावे?
तुम्ही वेरूळ लेणी येथे आहात, तर कैलास लेणे हे वेरूळ लेण्यातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध लेणे आहे. हे संपूर्ण मंदिर एकाच खडकातून वरपासून खालपर्यंत कोरलेले आहे, या मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर करण्यात आलेली आहे. यासह विश्वकर्मा लेणे, दशावतार लेणे, रावण की खाई आणि तीन ताल किंवा राजविहार, जैन लेणी या ठिकाणी पाहण्यासारखी आहेत. या सर्व लेण्यांमधील कोरीव काम, शिल्पे आणि कलाकृती अत्यंत बारकाईने व कुशलतेने कोरलेल्या आहेत.
वेरूळ लेण्यांपासून जवळच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे, हे मंदिर भगवान शंकराच्या 12 व्या ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि शेवटचे ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मंदिर हेमाडपंती वास्तुशैलीत बांधलेले आहे, लाल रंगाच्या दगडाचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आले असून त्यावर उत्कृष्ट कोरीव काम आणि शिल्पकला आढळते. घृष्णेश्वर मंदिर सुमारे 250 फूट बाय 185 आकाराचे असून ते भारतीय मंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. वेरूळ आणि खुलताबाद हे दोन्ही गावे जवळच आहे. खुलताबाद गावात भद्रा मारुती हे मंदिर प्रसिद्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी मारुतीरायाच्या दर्शनासाठी येत असतात.
अजिंठा लेण्या ह्या त्यांच्या भित्तीचित्रांसाठी ओळखल्या जातात. त्या जातक कथांवर आधारित आहेत. ज्यात बुद्धांच्या मागील जन्माचे वर्णन केलेले आहे. चित्रांमधून मानवी भावभावना, तत्कालीन जीवनशैली, वेशभूषा आणि संस्कृतीचे दर्शन घडते. पद्मपाणी आणि वज्रपाणी ही येथील प्रसिद्ध चित्रे आहेत.