अमरावती : अमरावतीमध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत. त्यापैकी एक असलेलं म्हणजे शिव टेकडी ज्याला माल टेकडी म्हणूनही संबोधल्या जाते. शिव टेकडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा आहे. त्याचबरोबर पुतळ्याच्या बाजूला दर्गाह सुद्धा आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक भेटी देतात. या ठिकाणी अजूनही बांधकाम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन त्या ठिकाणी दाखवण्यात येईल अशा प्रकारचे बांधकाम त्या ठिकाणी सुरू आहे.
advertisement
अमरावती मेन बस स्टॉप वरून अगदी 500 मीटर अंतरावर शिव टेकडी आहे. शिव टेकडी लाच माल टेकडी म्हणूनही संबोधल्या जाते. शिव टेकडी येथे प्रवेश करताच तुम्हाला अनेक फुल हारांची दुकाने दिसतील. त्यानंतर समोर गेलं की, तुम्हाला एक चढता रस्ता दिसेल. तो रस्ता पार करत असताना सर्वत्र हिरवेगार निसर्गरम्य वातावरण आणि पक्षांचा चिवचिवाट ऐकायला येईल. त्यानंतर पायऱ्या दिसतील तेथून तुम्हाला महाराजांच्या पुतळ्याकडे जाता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा तुम्हाला बघायला मिळेल.
पर्यटनाच्या राजधानीत घ्या सुट्ट्यांचा आनंद, संभाजीनगरमधील 7 प्रसिद्ध ठिकाणे पाहिली का?
पुतळ्याच्या बाजूला सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित कलाकृती सुद्धा बघायला मिळेल. ज्या मध्ये महाराजांचा जन्म, सोन्याच्या नांगराने पुण्याची जमीन नांगरली, शिवरायांचे शस्त्र व अश्व शिक्षण, स्वराज्याची शपथ, तोरणा गडावर स्वराज्याचे धोरण, पावनखिंड, शाहिस्तेखानाची बोटे तुटली, सुरतेवर स्वारी, सागरी सत्तेची उभारणी, आग्रा भेट व सुटका, आधी लगीन कोंढाण्याचं, न्याय निवाडा, संत तुकाराम महाराज व शिवराय भेट, राज्याभिषेक या सर्व बाबींचे दर्शन घडवले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे एक हजरत गौस आजम दस्तगीर यांचा दर्गाह सुद्धा आहे. त्या ठिकाण हून इतर दृश्य अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते. सकाळी 5 ते रात्री 9.30 पर्यंत शिव टेकडी येथे प्रवेश देण्यात येतो. अगदी कमीत कमी खर्चात तुम्हाला या पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळाला भेट देता येईल. या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखील मुलांना दाखवू शकता.