अमरावती : अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा अमरावती जिल्हा प्रचलित आहे. विकेंडमध्ये फिरायला जाण्यासाठी अमरावतीमध्ये अनेक स्थळ आहेत. ज्याठिकाणी जावून तुम्ही नवनवीन गोष्टींची माहिती सुद्धा घेऊ शकता आणि एन्जॉय सुद्धा करू शकता. त्यापैकी एक म्हणजे अमरावतीमधील तिवसा तालुक्यातील मोझरी गाव. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेलं तिवसा तालुक्यातील मोझरी हे गाव जगाच्या इतिहासात सुद्धा अजरामर झालेल आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी, प्रार्थना मंदिर, राम कृष्ण हरी मंदिर दास टेकडी आणि बरच काही मोझरी येथे बघण्यासारखं आहे.
advertisement
मोझरी या गावाबाबत तेथील सरपंच सुरेंद्र भिवगडे लोकल 18 शी बोलताना सांगितले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मत असे होते की, गोरगरीब जनता ही मथुरा, वृंदावन, काशी, पंढरपूर या ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणून त्यांनी विश्व मानव मंदिर, राम कृष्ण हरी मंदिराची स्थापना केली. म्हणजेच गोरगरीब लोकांची काशी ही मोझरी येथेच असावी तिथेच त्यांनी दर्शन घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातली अशी ग्रामपंचायत जिथे आईच्या नावाने आहे पाट्या, अख्खं गाव करतंय कौतुक!
गुरूकुंज आश्रम आणि समाधी मंदिर
अमरावती वरून 35 किलोमीटर अंतरावर तिवसा तालुक्यात मोझरी हे गाव आहे. या ठिकाणी गेल्यानंतर सर्व प्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कुरुकुंज आश्रम आहे त्याच ठिकाणी प्रार्थना मंदिर येथे भेट देऊ शकता. मंदिरात जाऊन तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि तुमचे मन सुद्धा एकाग्र होईल. त्या मंदिरात शांतता पाळली जाते. त्याच परिसरात महाराजांनी वापरलेल्या वस्तू, त्यांच्या आई वडिलांच्या प्रतिमा, राष्ट्रसंतांचा बैठक हॉल आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला जेवणाची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे.
त्यानंतर त्याच मंदिराच्या पुढे महाराजांची समाधी आहे. जिथे सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता. समाधीच्या बाजूला महाराजांचा गाडीच्या पार्ट पासून बनवलेला भव्य पुतळा सुद्धा आहे. तेथील सर्व परिसर बघितल्या नंतर तुम्ही राम कृष्ण हरी मंदिर दास टेकडी येथे जाऊ शकता.
राम कृष्ण हरी मंदिर दासटेकडी
तेथील देखावा अतिशय आकर्षक असा आहे. हिरवी गार झाडे, उंचच उंच मंदिर हे सर्व बघून त्या ठिकाणी मन रमून जाते. या मंदिरात तुम्ही जसे जसे आत जाल तस तसे तुम्हाला थोर पुरुषांच्या प्रतिमेचे दर्शन होईल. फोटो प्रेमींसाठी आकर्षक स्पॉट येथे आहेत. जिथून तुम्ही सुंदर सुंदर फोटो काढू शकता. ऐतिहासिक आणि आकर्षक अशा या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट देऊन बघा. अमरावती वरून डायरेक्ट तिवसा मोझरी बस आहे. त्याने तुम्ही प्रवास करू शकता. कमीत कमी खर्च तुम्ही राष्ट्रसंतांच्या आठवणीना भेट देऊ शकता.