ठाणे : गजबजलेल्या ठाण्यात जर तुम्हाला कोणते शांत ठिकाण खुणावत असेल तर ते आहे ठाण्याच्या मध्यभागी असलेले नमो द ग्रँड सेंट्रल पार्क आहे. शांत वातावरण आणि हिरवळ हे या सेंट्रल पार्कचे वैशिष्टय आहे. सुट्टीच्या दिवसात तर मुंबईकर आवर्जून इथे भेट देतात.
ठाणे स्थानकापासून बसने फक्त पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही या नमो द सेंट्रल पार्कला पोहोचू शकता. ठाणे स्थानकात उतरल्यानंतर तेथून बस स्थानकात आल्यानंतर 98 किंवा 95 नंबरची कोलशेत गावची बस पकडून फक्त पंधरा रुपये देऊन तुम्ही या नमो द सेंट्रल पार्क ठिकाणी जाऊ शकता. इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला साधारण दहा मिनिटे चालत जाऊन तिकीट काउंटर लागेल तिथे तुम्हाला 20 रुपये देऊन एन्ट्री घ्यावी लागेल. आणि मग सुंदर असं सेंट्रल पार्क गार्डन तुम्हाला पाहता येईल.
advertisement
महिलेने लढवली वेगळी शक्कल, रेल्वे प्रवाशांना देते जेवण, वर्षाला 8 लाखांची कमाई
नमो द सेंट्रल पार्क याचे मुख्य आकर्षण म्हणजे हा संपूर्ण परिसर सुमारे 20. 5 एकर जागेवर उभारण्यात आला आहे. काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. या पार्कमध्ये विविध प्रकारची 3500 फुल-फळ झाडे असून या वनराईतून वर्षाला 884 हजार लाख पौंड ऑक्सीजनची निर्मिती होते.
लहान मुलांसाठी तर हे उत्तम ठिकाण आहे. तुम्हाला जर कामाचा ताण असेल तर इथलं पर्यावरण, निसर्ग नक्कीच तुम्हाला सगळं विसरायला भाग पाडेल. फोटोशूटसाठी आणि व्हिडिओ शूटसाठी एक उत्तम जागा आहे. मग वाट कसली पाहताय ठाणेकर धावपळीच्या जीवनातून कंटाळा आला असेल तर संध्याकाळच्या काही वेळात इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता.