TRENDING:

Weight loss : 7 दिवसात वजन कमी करायचंय? मग किचनमधील हळदीचा 5 पद्धतीने करा वापर

Last Updated:

वजन कमी करण्यासाठी बरेचजण विविध उपायांचा अवलंब करतात, परंतु तुम्हाला माहितीये का? की किचनमधील एक चिमूटभर हळद काही दिवसात तुमचे वजन नियंत्रणात आणू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतातील प्रत्येक घराच्या किचनमध्ये हळदीचा उपयोग केला जातो. हळद पदार्थाला चव आणण्यासाठी जेवढी उपयोगी ठरते, तेवढीच ती आरोग्यासाठी देखील गुणकारी आहे. सध्या अनेकजण वजन वाढीच्या समस्येने त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी बरेचजण विविध उपायांचा अवलंब करतात, परंतु तुम्हाला माहितीये का? की किचनमधील एक चिमूटभर हळद काही दिवसात तुमचे वजन नियंत्रणात आणू शकते.
वजन कमी करण्यासाठी हळदीचे फायदे
वजन कमी करण्यासाठी हळदीचे फायदे
advertisement

हळदीमध्ये एंटीऑक्सीडेंट्स आणि एंटी-इन्फ्लेमेटरी हे गुणधर्म असतात ज्यामुळे हळदीच्या सेवनाने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. हळदीचे नियमित सेवन केल्यास शरीरातील अतिरिक्त फॅट्स बर्न होतात आणि वजन कमी होते.

हळदीचे पाणी :

सकाळी रिकाम्या पोटी हळदीच्या पाण्याचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म चांगले राहते आणि फॅट बर्न होण्यास मदत होते. हळदीचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यात कच्च्या हळदीचे तुकडे टाकून पाण्याला उकळी काढून घ्यावी. मग पाणी थोडे कोमट झाले की त्यामध्ये मध आणि लिंबू मिसळून त्याचे सेवन करावे. हळदीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

advertisement

हळद आणि दूध :

हळदीचे दूध वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी एक ग्लास गरम दुधात एक चमचा हळदी पावडर मिक्स करावी आणि त्याला व्यवस्थित मिक्स करावे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन केल्यास वजन लवकर कमी होण्यास मदत होते.

Constipation Relief : औषधापेक्षाही प्रभावी आहे हा मसाला! एक चिमूट कायमचा संपवेल बद्धकोष्ठतेचा त्रास

advertisement

हळद आणि आल :

वजन कमी करण्यासाठी हळद आणि आल्याचे सेवन फायदेशीर ठरते. या दोघांचे मिश्रण तयार करून त्याचे सेवन केल्यास शरीरातील अतिरिक्त फॅट्स बर्न होतात. यासाठी एक कप पाण्यात एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन चिमूटभर हळद टाकून पाण्याला उकळी काढा. मग हे पाणी व्यवस्थित गाळून हे पाणी घोट घोट करून प्यावे.

advertisement

हळद आणि मध :

हळद आणि मधाचे मिश्रण वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी एका वाटीत एक चमचा मध घ्यावे आणि त्यात थोडी कच्ची हळद मिसळावी. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हळदीच्या पाण्यात मध देखील मिसळू शकता.

हळद आणि दालचिनी :

हळद आणि दालचिनीमुळे देखील वजन कमी करण्यास फायदा होतो. या दोन पदार्थांचे एकत्रितपणे सेवन केल्यास ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. यासाठी एका भांड्यात एक कप पाणी गरम करा आणि त्यात एक दालचिनीचा तुकडा टाका आणि वरून चिमूटभर हळद टाका आणि या मिश्रणाला थोडी उकळी काढा. मग हे पाणी गाळून त्याचे सेवन करा. रोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहील.

advertisement

(सदर माहिती ही इंटरनेटवरून मिळालेल्या मजकुरावर आधारित आहे. त्यामुळे आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight loss : 7 दिवसात वजन कमी करायचंय? मग किचनमधील हळदीचा 5 पद्धतीने करा वापर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल