TRENDING:

Skinimalism : स्किनकेअरमधला नवीन मंत्रा, समजून घेऊया less is more चा नेमका अर्थ काय ?

Last Updated:

गेल्या काही काळापासून, 10-स्टेप कोरिअन स्किनकेअर सोशल मीडियावर ट्रेंड होतंय. चांगल्या त्वचेसाठी प्रत्येकजण विविध उत्पादनं वापरत असतो. पण आता, एक नवीन पद्धत ट्रेंड होतंय. ज्याला स्किनीमॅलिझम म्हणतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! नवीन वर्ष सुरु झालंय. गेल्या वर्षी म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत सुरु असलेल्या एका ट्रेंडविषयी समजून घेऊया. हा ट्रेंड आहे स्किनकेअरमधला. आपलं व्यक्तिमत्व कसं दिसावं यासाठी सेल्फ केअर, स्किन केअर उत्पादनांना भरपूर मागणी आहे.
News18
News18
advertisement

गेल्या काही काळापासून, 10-स्टेप कोरिअन स्किनकेअर सोशल मीडियावर ट्रेंड होतंय. चांगल्या त्वचेसाठी प्रत्येकजण विविध उत्पादनं वापरत असतो. पण आता, एक नवीन पद्धत ट्रेंड होतंय. ज्याला स्किनीमॅलिझम म्हणतात.

स्किनीमॅलिझम म्हणजे 'स्किन' आणि 'मिनिमलिझम' या शब्दांचं मिश्रण. याचा अर्थ त्वचेच्या गरजांनुसार कमी उत्पादनं वापरून त्वचेची काळजी घेणं. या ट्रेंडचा अर्थ समजून घेऊया.

advertisement

Health Tips : हेल्थ ड्रिंक देईल दिवसभराची ऊर्जा, नवीन वर्षासाठी आरोग्यदायी टिप्स

स्किनिमॅलिझम 'less is more' या तत्त्वावर आधारित आहे. त्वचेवर उत्पादनांचे थर लावण्याऐवजी, त्वचेला खरोखर आवश्यक असलेल्या उत्पादनांचा वापर करण्यावर भर देणं अशी यामागची संकल्पना आहे. यामुळे त्वचेच्या नैसर्गिक संरक्षक थराचं रक्षण करणं हा यामागचा हेतू आहे. मिनिमलिझम म्हणजे कमीत कमी  साधनांचा वापर करणं.

advertisement

त्वचेची गरज ओळखा आणि गरजेनुसार खरेदी करा. सर्वात आधी, त्वचेचा प्रकार म्हणजे तेलकट आहे की कोरडी किंवा दोन्हीचं म्हणजे ऑईली + ड्राय कॉम्बिनेशन असा प्रकार समजून घ्या.

जाहिरात पाहून, बाजारात दिसणारं प्रत्येक नवीन सीरम किंवा मास्क खरेदी करण्याची गरज नाही. त्वचेच्या मुख्य समस्या जसं की मुरुमं, पिग्मेंटेशन किंवा कोरडेपणा यावर आधारित उत्पादनं निवडा.

advertisement

स्किनिमलिझमचा 'एबीसी'पॅटर्न लक्षात ठेवा - स्किनिमलिझममधे तीन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

क्लिनिंग - दिवसातून दोनदा सौम्य क्लींजरनं चेहरा स्वच्छ करा.

मॉइश्चरायझिंग - त्वचेच्या प्रकाराला अनुकूल असलेलं मॉइश्चरायझर लावा, जेणेकरून ओलावा म्हणजेच आर्द्रता टिकून राहील.

सनस्क्रीन - ही सर्वात महत्वाची पायरी आहे. घरात असाल किंवा बाहेर, कधीही सनस्क्रीन विसरू नका.

Exfoliation : घरी तयार करा विंटर स्पेशल स्क्रब, जाणून घ्या विविध पर्याय आणि कृती

advertisement

मल्टी-टास्किंग उत्पादनं - एकाच वेळी दोन कामं होतील अशी उत्पादनं वापरण्याचा प्रयत्न करा. लिप बाम जो गालाच्या रंगासाठी म्हणजे टिंटचंही काम होईल. यामुळे तुमच्याकडे असलेल्या उत्पादनांची संख्या कमी होईल आणि वेळ वाचेल. टिंट म्हणजे मेकअपसाठी, रंगांचं मिश्रण करण्यासाठी वापरलं जाणारं एक उत्पादनं.

स्किनीमलिझमचे फायदे -

त्वचेचं आरोग्य - जास्त उत्पादनांमुळे त्वचेच्या पीएच पातळीत अडथळे येऊ शकतात. कमी उत्पादनं वापरल्यानं जळजळ होण्याचं प्रमाण कमी होतं.

वेळ आणि पैशांची बचत - स्किनकेअरसाठी बरीच उत्पादनं वापरण्यापेक्षा, वेगवेगळे थर एकावर एक लावण्यापेक्षा कमी उत्पादनांचा वापर करा. यामुळे मौल्यवान वेळ वाचेल आणि अनावश्यक खर्चही कमी होतील.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कष्टाचं चीज होणार, प्रेम, पैसा, प्रतिष्ठा मिळणार, पण वृषभ राशीवाले यंदा ‘ती’ चूक
सर्व पहा

पर्यावरणपूरक - कमी उत्पादनं खरेदी करणं म्हणजे कमी प्लास्टिक कचरा करणं, पर्यावरणाचं नुकसान रोखणं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skinimalism : स्किनकेअरमधला नवीन मंत्रा, समजून घेऊया less is more चा नेमका अर्थ काय ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल