चेहऱ्याची नैसर्गिकरित्या काळजी घेण्यासाठी स्वयंपाकघरातल्या अनेक गोष्टी फायदेशीर आहेत. यामुळे केवळ त्वचा स्वच्छ होतेच तसंच त्वचा डागरहित आणि मऊ राहते. साबणाऐवजी वापरता येतील असे काही घरगुती पर्याय पाहूया.
Fatty Liver : फॅटी लिव्हरची समस्या रोखणं शक्य, आहारातले बदल ठेवतील यकृत परफेक्ट
बेसन - त्वचेच्या स्वच्छतेसाठी प्राचीन काळापासून बेसनाचा वापर केला जातो आहे. त्यात क्लिंजिंग आणि एक्सफोलिएटिंग गुणधर्म आहेत, ज्यामुळे मृत त्वचा काढून टाकली जाते आणि चेहरा स्वच्छ आणि चमकदार राहतो. ते दूध किंवा गुलाबपाण्यात मिसळून वापरता येईल.
advertisement
दूध - कच्चं दूध त्वचेसाठी एक उत्तम क्लिंजर आहे. त्यात लॅक्टिक एसिड असतं, यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि ओलावा देखील टिकवून ठेवते. मऊ कापसाच्या गोळ्यांनी दूध चेहऱ्यावर लावा आणि काही मिनिटांनी साध्या पाण्यानं धुवा.
मुलतानी माती - मुलतानी मातीमुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकलं जातं आणि चेहऱ्यावरील छिद्रं स्वच्छ होतात. यामुळे मुरुम देखील कमी होतात. ते गुलाबपाण्यात मिसळा आणि लावा.
कोरफड गर- कोरफडीत अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. मुरुम कमी करण्यासाठी आणि त्वचेला आराम देण्यासाठी कोरफड उपयुक्त आहे.
मध - शुद्ध मधामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि बॅक्टेरियापासून संरक्षण करते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि मऊ होतो. हलक्या हातानं मालिश करा आणि साध्या पाण्यानं धुवा.
Vitamin B12: या लक्षणांकडे दुर्लक्ष नको, अनेक गंभीर समस्यांना वेळीच घाला आळा
हळद आणि दही - हळदीत अँटीसेप्टिक गुणधर्म असतात आणि दह्यात लॅक्टिक एसिड असतं. हे मिश्रण त्वचेचा रंग उजळवतं आणि पोषण देतं.
कडुनिंब पावडर - कडुनिंब पावडरीमुळे मुरुम कमी होतात. वापरण्यासाठी गुलाबपाण्यात मिसळा आणि फेसपॅक म्हणून लावा.
ओट्स - ओट्स त्वचेला हळूवारपणे एक्सफोलिएट करतात आणि खडबडीतपणा दूर करतात. ओट्स दुधात मिसळा आणि स्क्रब म्हणून वापरा.
या घरगुती उपायांनी, साबणाचे दुष्परिणाम टाळता येतात आणि त्वचेवर नैसर्गिकरित्या चमक येईल.
