TRENDING:

Skin Care : मऊ आणि चमकदार त्वचेसाठी टरबुजाच्या बिया आहेत वरदान, जाणून घ्या कसा करायचा वापर

Last Updated:

त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी टरबुजाच्या बिया वरदान आहेत. या बियांमुळे, मुरुमंही कमी होतात.  त्वचेचं मॉईश्चरायझेशन, त्वचेचा पोत चांगला राखण्यासाठी या बिया उपयुक्त ठरतात. समजून घेऊया या बियांमधले पोषक घटक आणि त्याचा त्वचेसाठीचा उपयोग.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : फलाहार तब्येतीसाठी उत्तम मानला जातो. तसंच काही फळं विशेषत: त्वचेसाठी उपयुक्त असतात. फळांप्रमाणेच फळांच्या बिया हाही एक चांगला पर्याय आहे.
News18
News18
advertisement

त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी टरबुजाच्या बिया वरदान आहेत. या बियांमुळे मुरुमंही कमी होतात.  त्वचेचं मॉईश्चरायझेशन, त्वचेचा पोत चांगला राखण्यासाठी या बिया उपयुक्त ठरतात. समजून घेऊया या बियांमधले पोषक घटक आणि त्याचा त्वचेसाठीचा उपयोग.

टरबुजाच्या बियांमधले पोषक घटक - टरबुजाच्या बियांमधे जीवनसत्त्वं अ, ब आणि ई,  तसंच मॅग्नेशियम, लोह - आयर्न, तांबं - कॉपर, पोटॅशियम, लिनोलिक ॲसिड, ओलेइक ॲसिड आणि पामिटिक ॲसिड असतं.

advertisement

Digestion : पोट स्वच्छ ठेवण्यासाठी करा हे पूरक बदल, दिवसभर वाटेल फ्रेश

त्यात स्टीरिक ॲसिड आणि इतर पोषक घटक असतात. हे घटक त्वचा आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

मुरुम - मुरुम घालवण्यासाठी टरबुजाच्या बियांचा वापर करता येईल. यातल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, त्वचेवरची सूज कमी करणं शक्य होतं. चेहऱ्यावरची छिद्रं स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी याचा उपयोग होतो.

advertisement

त्वचा चांगली राखण्यासाठी, आहारात कलिंगडाच्या बियांचा समावेश करू शकता. बिया भाजून सॅलडमधे घालू शकता.

Weight Loss : नवीन वर्षात करा वजन कमी, सकारात्मकता, सातत्य कायम ठेवा

टरबुजाच्या बियांचं तेल - त्वचा उजळवण्यासाठी टरबुजाच्या बियांचं तेल वापरू शकता. झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा, हलक्या हातानं मसाज करा आणि नंतर झोपा.

फेस मास्क - टरबुजाच्या बियांचा वापर फेस मास्क म्हणून देखील करू शकता. यासाठी, टरबूजाच्या बियांची पावडर बनवा आणि त्यात दही, मध किंवा कच्चं दूध मिसळा आणि चेहऱ्याला लावा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
छत्रपती संभाजीनगर शहराला खरंच 52 दरवाजे होते का? सध्या किती आहेत? संपूर्ण माहिती
सर्व पहा

ॲलर्जी येत असेल तर पॅच टेस्ट करणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : मऊ आणि चमकदार त्वचेसाठी टरबुजाच्या बिया आहेत वरदान, जाणून घ्या कसा करायचा वापर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल