फक्त रमेशच नाही तर कित्येकांची ही तक्रार आहे, मी जेवण जसं आधी खात होतो, तसंच आता पण खातो, पण वजन अचानक वाढलंय! का? अन्नाचं प्रमाण तितकंच असेल तरीही वजन वाढत असेल तर त्यामागे अनेक शरीरिक, हार्मोनल, न्यूरोलॉजिकल आणि जीवनशैलीशी संबंधित कारणं असू शकतात.
मेटिबोलिझम किंवा चयापचय आणि शरीराची ऊर्जा वापरण्याची क्षमता
advertisement
हार्वर्डच्या अभ्यासानुसार तुम्ही जेवणाच्या कॅलरी प्रमाणात बदल केले नाही तरी शरीराने कॅलरी कशी बर्न केली किंवा ऊर्जेमध्ये बदलली, यावर वजन अवलंबून आहै. शरीरात जेव्हा चयापचय मंदावतो तेव्हा हळू हळू शरीरात साठणाऱ्या कॅलरीजना कमी ऊर्जा खर्च केल्यामुळे चरबी स्वरूपात साठवलं जातं. म्हणजे खाण्याचं प्रमाण तितकंच आहे तरीही शरीर कमी कॅलरी वापरत असल्यास जास्त साठवते आणि परिणामी वजन वाढतं.
हार्मोनल बदल
क्लेवलँड क्लिनिकमधील माहितीनुसार शरीरातील हार्मोन बॅलेन्स हे वजन आणि शरीराच्या ऊर्जा नियंत्रणात अत्यंत महत्त्वाचे आहेत थायरॉईड ग्रंथी जर योग्य प्रमाणात हॉर्मोन (T3/T4) बनवत नसतील तर शरीराची ऊर्जा वापरण्याची क्षमता कमी होते. याला हायपोथायरॉईडिझम म्हणतात आणि यामुळे वजन वाढते. जर शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत तर साखर ऊर्जेत बदलण्याऐवजी चरबी स्वरूपात साठू शकते, परिणामी वजन वाढते. दीर्घ काळ तणावात राहिल्यास शरीरात कोर्टिसोल वाढतो, जो फॅट स्टोरेज वाढवतो आणि वजन वाढीस कारणीभूत ठरतो.
वयानुसार शरीर संरचना बदलणे
वय वाढत गेल्यावर शरीराची मसल कमी होऊ लागतं आणि तो भाग फॅटमध्ये बदलतो. हे नेमकं तुमच्या आहारातील कॅलरी प्रमाणात बदल न करता सुद्धा वजन वाढू देऊ शकते. कारण विशेषतः 30+, 40+ वयाच्या लोकांमध्ये दिसून येतं. त्यांचं शरीर आधीच्या प्रमाणात कॅलरी बर्न करत नाही, त्यामुळे वजन वाढू शकते.
झोपेची फक्त वेळ नाही, गुणवत्ता गरजेची
झोप पूर्ण मिळालेली असली तरीही झोपेची गुणवत्ता नीट नसेल, तर शरीरातील हंगर हार्मोन संतुलन बिघडू शकतं आणि हे वजन वाढीस कारणीभूत ठरतं. झोप कमी मिळालेल्या लोकांमध्ये शरीर आपोआप भूक वाढवते आणि चरबी जमा करण्याच्या प्रक्रियेला चालना देते.
औषधे आणि दुष्परिणाम
काही औषधं शरीरात चयापचय बदल, भूख वाढ किंवा शरीरात पाणी साठवणं यामुळे वजन वाढवू शकतात.
गट बाक्रोबायोम
शरीराच्या आतड्यांमध्ये असलेले बॅक्टेरिया अन्नपचन, ऊर्जा शोषण आणि चरबी व्यवस्थापन मध्ये भूमिका बजावतात. संशोधनानुसार आतड्यातील बॅक्टेरियल संतुलन बदलल्यास ते वजन वाढवण्यास कारणीभूत असू शकते.
लैंगिक फरक आणि हार्मोनल ट्रान्झिशन
स्त्रियांसाठी मेनोपॉज नंतर हार्मोनल बदल हे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. शारीरिक ऊर्जा वापरण्याच्या प्रक्रियेत बदल येतो आणि चरबीचे साठे वाढतात. हे कारण विशेषतः मध्यम वयीन महिला वर्गात महत्त्वाचं आहे.
जेनेटिक्स आणि कौटुंबिक परिणाम
काही लोकांचं शरीर अनुवंशिक रूपात कमी ऊर्जा वापरणारे किंवा चरबी साठवण्याची प्रवृत्ती असलेले असते. याचा परिणाम असे होऊ शकतो की जेवणाचा प्रमाण न बदलता वजन वाढतं.
खाणंपिणं काहीच बदललं नसेल आणि तुमचं वजन अचानक वाढत असेल आणि सोबत थकवा किंवा कमजोरी, पोटावर वाढलेली चरबी, BP किंवा शुगर वाढ, थायरॉईड किंवा हार्मोनल बदलाशी संबंधित लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
