व्यायाम
कातळकर सांगतात की, "वजन कमी करणं म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर संपूर्ण जीवनशैली सुधारण्याची प्रक्रिया आहे. वजन कमी होण्यामागे 70 टक्के डायट, 20 टक्के व्यायाम आणि 10 टक्के विश्रांती हे तीन घटक काम करत असतात. जिममध्ये विविध प्रकारचे व्यायाम असतात. कार्डिओ, वेट ट्रेनिंग, HIIT हे सर्व प्रकार शरीरातील कॅलरी जाळतात, स्नायूंना बळकटी देतात, आणि शरीर अधिक सक्रिय ठेवतात.
advertisement
खाद्यपदार्थ की सप्लिमेंट्स? तुमच्या शरीरासाठी काय महत्त्वाचं? तज्ज्ञांनी दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला
आहार
आहार चुकीचा असेल तर वजन कमी होणं कठीण बनतं. साखरयुक्त, तळलेले, तेलकट, आणि प्रोसेस्ड पदार्थ खाल्ले जात असतील, तर व्यायामाचा पूर्ण फायदा मिळत नाही. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं ‘कॅलरी डेफिसिट’ आहे. तुम्ही जितकं खात आहात त्यापेक्षा जास्त ऊर्जा खर्च केली पाहिजे. यासाठी प्रथिनंयुक्त, फायबरयुक्त, आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे.
विश्रांती
तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान 7-8 तास झोप घेणं, भरपूर पाणी पिणं, मानसिक तणाव कमी करणं, आणि नियमित वेळेवर जेवण घेणं हे देखील शरीराच्या चयापचयावर परिणाम करतं.
दरम्यान, वजन कमी करण्यासाठी या त्रिसूत्रीवर लक्ष दिल्यास पद्धतशीरपणे महिन्याला 4 ते 5 किलो वजन कमी करणं शक्य आहे. तसेच 3 महिन्यांत 10 ते 15 किलो वजन घटवता येऊ शकतं. म्हणूनच, वजन कमी करण्याचा खरा मंत्र म्हणजे योग्य आहार, नियमित व्यायाम, आणि शिस्तबद्ध जीवनशैली आहे, असंही कातळकर सांगतात.