सोशल मीडियामुळे होणारे आरोग्यावरील दुष्परिणाम
नैराश्य आणि चिंता
सोशल मीडियावर सतत इतरांच्या 'परफेक्ट' आयुष्याशी तुलना केल्याने तरुणांमध्ये असुरक्षितता आणि नैराश्य वाढत आहे. यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि समाजामध्ये एकटेपणा जाणवतो.
झोपेच्या पद्धतीत बिघाड
रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर स्क्रोल केल्याने डोळ्यांवर निळ्या प्रकाशाचा थेट परिणाम होतो, ज्यामुळे शरीरातील नैसर्गिक झोपेचे चक्र बिघडते. यामुळे झोपेच्या समस्या निर्माण होतात, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही बिघडते.
advertisement
डोपामाइनची सायकल
सोशल मीडियावर मिळणारे लाइक्स आणि कमेंट्स हे मेंदूतील डोपामाइन नावाच्या रसायनाला उत्तेजित करतात. यामुळे व्यक्तीला तात्पुरता आनंद मिळतो, पण याची सवय लागल्यामुळे मेंदूला सतत उत्तेजित करण्याची गरज भासते, जे एका व्यसनासारखेच आहे.
शारीरिक हालचालीचा अभाव
मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्याने तरुण पिढी शारीरिक हालचाली कमी करते. हा बैठी जीवनशैली लठ्ठपणा आणि इतर गंभीर आजारांना आमंत्रण देते.
एकाग्रतेचा अभाव
सतत नवीन माहितीचा प्रवाह आणि शॉर्ट फॉर्म व्हिडिओ यामुळे तरुण पिढीची एकाग्रता कमी होत आहे. एका विषयावर लक्ष केंद्रित करणे त्यांच्यासाठी कठीण होते.
बॉडी इमेजची समस्या
सोशल मीडियावरील 'परफेक्ट' शरीराची प्रतिमा पाहून अनेक तरुणांमध्ये स्वतःच्या शरीराबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. यामुळे खाण्याच्या सवयी बिघडणे आणि मानसिक अस्वस्थता वाढते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)