TRENDING:

लिंबू आणि लवंग एकत्र खाल्ल्याने काय होतं? डॉक्टरांनी सांगितले 3 दिवसांतच आश्चर्यकारक परिणाम

Last Updated:

Lemon Cloves Benefits : आजवर तुम्ही लिंबू-मधाचं कॉम्बिनेशन ट्राय केलं असेल पण लिंबू आणि लवंग एकत्र खाऊन पाहिलं आहे का? डॉक्टरांनी याचे आश्चर्यकारक फायदे सांगितले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : लिंबू, लवंग जवळपास प्रत्येक भारतीय कुटुंबाच्या किचनमध्ये असतात. ज्यांचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. दोन्हीही पदार्थांना चव देणाऱ्या गोष्टी. पण या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर काय होईल तुम्हाला माहिती आहे का? लिंबू आणि लवंग दोन्ही गोष्ट एकत्र खाल्ल्याने काय होऊ शकतं, हे डॉक्टरांनीच सांगितलं आहे. त्यांनी 3 दिवसांतच याचा आश्चर्यकारक परिणाम दिसेल असं म्हटलं आहे.
News18
News18
advertisement

प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी लवंग आणि लिंबू एकत्र खाण्याचे परिणाम सांगितले आहेत. याचे जबरदस्त फायदे असल्याचं ते म्हणाले तसंच ते खाण्याची पद्धतही त्यांनी सांगितली आहे.

डॉ. सलीम जैदी म्हणाले, लिंबू आणि लवंग एकत्र खाल्ल्याने एक शक्तिशाली उपाय होतो.विशेषतः दररोज रिकाम्या पोटी, तुमच्या शरीरात प्रचंड बदल दिसून येतात.

advertisement

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड असते, जे बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्यास मदत करतं. तर लवंगामध्ये युजेनॉल नावाचं अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल कंपाऊंड असतं. जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात,  शरीराला आजारांशी लढण्याची शक्ती देतात. पावसाळ्यात, संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत या दोन्ही गोष्टींचे सेवन अधिक फायदेशीर ठरू शकते.

advertisement

Heart Attack : हार्ट अटॅक आल्यानंतर छातीवर किती वेळा दाब द्यावा, CPR देण्याचे नियम काय?

सांधेदुखीपासून आराम

लवंग आणि लिंबूमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. लवंगामध्ये असलेल्या युजेनॉलमध्ये दाहक-विरोधी प्रभाव असतो. त्याच वेळी, लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे जळजळ कमी करण्यास देखील मदत करू शकतात. या दोन्ही गोष्टींचे एकत्र सेवन केल्याने सांधेदुखी, कडकपणा आणि सूज यापासून आराम मिळू शकतो.

advertisement

पचनक्रिया चांगली राहते

तुम्हाला पचनाच्या समस्या असतील, पोट नीट साफ होत नसेल, गॅस किंवा अपचनाचा त्रास असेल, तर लिंबू आणि लवंग खूप फायदेशीर ठरू शकते. या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पोट स्वच्छ ठेवतात, गॅसच्या समस्या कमी करतात, पचन सुधारतात.

फुफ्फुसांसाठी फायदेशीर

लवंग आणि लिंबूचा चहा किंवा पाणी तुमच्या घशाला आराम देते आणि श्वसनाचे आरोग्य देखील सुधारतं. सर्दी, खोकला, घसा खवखवणे, दमा यासारख्या श्वसन आणि फुफ्फुसांच्या समस्यांमध्ये देखील त्याचे सेवन फायदेशीर ठरू शकतं.

advertisement

Health Tips : दह्यासोबत 'हे' पदार्थ खाणं पडू शकतं महाग! गंभीर आजारांना पडाल बळी, तज्ञांनी दिली माहिती

लवंग-लिंबूचं सेवन कसं करायचं?

तुम्ही लवंग आणि लिंबू एकत्र दोन वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता.

लिंबू-लवंग पाणी

एक लीटर पाण्यात लिंबाचा तुकडा आणि 5-6 लवंग टाका आणि रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी, दिवसभर हे पाणी थोडंथोडं प्या.

लिंबू आणि लवंग चहा

एक कप पाण्यात 2-3 लवंगा घाला आणि 5 मिनिटं उकळवा. त्यानंतर त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. हवं असल्यास  तुम्ही यात थोडं मधदेखील घालू शकता. हा लिंबू आणि लवंगाचा चहा तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता.

गर्भवती महिला, स्तनपान देणाऱ्या महिला किंवा आम्लपित्त आणि रक्तस्त्राव विकार असलेल्या लोकांनी हा उपाय करण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. याशिवाय सेन्सिटिव्ह दात असलेल्यांनीही काळजी घ्यावी, असा सल्लाही डॉ. सलीम झैदी यांनी दिला आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लिंबू आणि लवंग एकत्र खाल्ल्याने काय होतं? डॉक्टरांनी सांगितले 3 दिवसांतच आश्चर्यकारक परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल