महिनाभर मीठ खाल्लं नाहीतर...
मिठाचा मुख्य घटक सोडियम क्लोराईड आहे, जो शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यास, मज्जातंतूंच्या कार्याचे नियमन करण्यास आणि स्नायूंच्या आकुंचनास मदत करतो. सोडियमच्या कमतरतेमुळे शरीराची ही कार्ये विस्कळीत होऊ शकतात. जर तुम्ही एक महिना मीठ खाल्ले नाही, तर तुमच्या शरीरात कोणते बदल दिसतील?
या प्रकारचे होतील त्रास
मीठ खाणे बंद केल्याने रक्तातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे 'हायपोनेट्रेमिया' नावाची स्थिती निर्माण होऊ शकते. याची लक्षणे म्हणजे चक्कर येणे, थकवा जाणवणे आणि इतर समस्या. सोडियम शरीरातील पाण्याचे संतुलन राखते. मिठाच्या कमतरतेमुळे शरीर जास्त पाणी बाहेर टाकू शकते, ज्यामुळे निर्जलीकरणाचा धोका वाढेल. मिठाच्या कमतरतेमुळे स्नायूंना पेटके किंवा गोळे येऊ शकतात, कारण स्नायूंच्या आकुंचनासाठी सोडियम आवश्यक आहे.
advertisement
मीठ खावं, पण मर्यादित...
मीठ खाणे बंद केल्यास तुमच्या हृदयावरही परिणाम होईल. सोडियमची पातळी कमी झाल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि काही प्रकरणांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढतो. डॉ. पॉल रॉबसन मेहदी म्हणतात की, मीठ पूर्णपणे बंद करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ते दररोज कमी प्रमाणात मीठ खाण्याचा सल्ला देतात. मीठ आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, पण त्याचे जास्त सेवन करणेही हानिकारक आहे. एक महिन्यासाठी मीठ पूर्णपणे बंद केल्यास शरीरात विविध समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, संतुलित आहाराचा भाग म्हणून योग्य प्रमाणात मीठ सेवन करणे आरोग्यासाठी चांगले आहे.
हे ही वाचा : Chanakya Niti : पत्नीने पतीच्या 'या' भागाला स्पर्श केल्याने वाढतं प्रेम आणि घरात येते सुख-समृद्धी!
हे ही वाचा : Health Tip : ऐन तारुण्यात का येतोय हार्ट अटॅक? डाॅक्टरांनी सांगितलं त्यामागचं नेमकं कारण!