ग्रेटर नोएडा येथील ब्लिस आयव्हीएफ आणि गायनॅकॉलॉजी केअर क्लिनिकच्या संचालिका डॉ. सोनाली गुप्ता यांनी न्यूज18 ला सांगितलं की, लग्न करण्यासाठी कोणतंही परिपूर्ण वय नसतं. लग्नाचं वय हे सर्वांसाठी एकाच आकाराचं सूत्र नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार समजता तेव्हा ते लग्नासाठी सर्वोत्तम वय मानलं जातं. लग्नाचा निर्णय घाईघाईने घेऊ नये, तर योग्य वेळी आणि योग्य जोडीदारासोबत घ्यावा. तथापि, लग्नाचा निर्णय जास्त काळ पुढे ढकलू नये. योग्य वयात लग्न केल्याने कुटुंब नियोजन सोपं होऊ शकतं.
advertisement
Wedding Video : लग्नाचा व्हिडीओ पाहून भडकले लोक, असं यात काय दिसलं?
योग्य वयात लग्न करण्याचे काय फायदे आहेत?
डॉ. सोनाली म्हणाल्या की, पुरुष आणि महिलांसाठी लग्नाचं आदर्श वय वेगवेगळे असू शकते, परंतु निरोगी, आनंदी आणि स्थिर जीवनासाठी योग्य वेळी लग्न करणं खूप महत्त्वाचं आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार, लग्नासाठी सर्वोत्तम वय महिलांसाठी 21 ते 30 वर्षे आणि पुरुषांसाठी 25 ते 33 वर्षे आहे. या वयात शरीर प्रजननक्षमतेच्या शिखरावर असतं आणि लोक मानसिकदृष्ट्या प्रौढ होतात. या वयापर्यंत बहुतेक लोकांनी त्यांच्या करिअरबाबत निर्णय घेतलेले असतात. योग्य वयात लग्न केल्याने सामान्य गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते आणि गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो. हे कुटुंब नियोजनात मदत करू शकतं. सर्वात तंदुरुस्त आणि निरोगी व्यक्ती 21 ते 30 वर्षे वयोगटातील असते.
क्या बात है मामा! शेतकऱ्याची मुलं, पण भाचाभाचीच्या लग्नात 3 कोटींचा आहेर दिला
लग्न पुढे ढकलण्याची योजना असेल तर काय करावं?
आयव्हीएफ तज्ज्ञांच्या मते, लग्न वेळेवर व्हायला हवं, परंतु बरेच लोक वयाच्या 30 व्या वर्षीही लग्नासाठी तयार नसतात. जर एखाद्या व्यक्तीला 30 वर्षांनंतर लग्न करायचं असेल तर त्याने अंडी किंवा शुक्राणू गोठवण्यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. यामुळे त्यांना मोठ्या वयात मुलं होऊ न शकण्याची समस्या टाळण्यास मदत होऊ शकते. 30 वर्षांनंतर पुरुष आणि महिलांची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. यामुळे अनेक जोडप्यांना पालक होण्याचं स्वप्न पूर्ण करता येत नाही. तथापि, आजकाल आयव्हीएफसह अनेक उपचार उपलब्ध आहेत, ज्यांचा अवलंब केला जाऊ शकतो.