इरोटोमॅनिया आणि त्याचे संभाव्य परिणाम
इरोटोमॅनिया म्हणजे काय?
इमोफिलिया ही एक अशी मानसिक स्थिती आहे जिथे व्यक्तीला असे वाटत असते की, कोणी तरी त्यांच्यावर प्रेम करतं, किंवा सिक्रेटली त्यांच्या प्रेमात आहे. हे बऱ्याचदा भ्रम असतो, विशेषतः जेव्हा त्यांना वाटत की एखादी प्रसिद्ध व्यक्ती किंवा ज्या व्यक्तींना ते ओळखत नाहीत त्यांचं प्रेम आहे.
advertisement
'नजरेला नजर मिळणे' आणि आकर्षण
जेव्हा कोणाशीही नजरानजर होते आणि लगेच तीव्र आकर्षण किंवा 'प्रेम' वाटू लागते, तेव्हा हे भावनिक आकर्षणाऐवजी इरोटोमॅनियाचे लक्षण असू शकते. व्यक्ती त्या व्यक्तीच्या साध्या कृतींना किंवा नजरेला आपल्यावरील प्रेमाचे संकेत समजू लागते.
वास्तव आणि भ्रमातील फरक
इरोटोमॅनियामध्ये असलेल्या व्यक्तीला हे भ्रामक विचार येतात की समोरची व्यक्ती तिच्यावर प्रेम करते, जरी तसे खरे नसले तरी. यामुळे ती व्यक्ती चुकीचे निष्कर्ष काढू शकते.
मानसिक आणि भावनिक दुष्परिणाम
या स्थितीमुळे व्यक्तीला प्रचंड मानसिक ताण आणि भावनिक गोंधळ जाणवू शकतो. चुकीच्या समजुतींमुळे त्या व्यक्तीचे सामाजिक जीवन आणि नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
वास्तवापासून दूर जाणे
इरोटोमॅनियामध्ये व्यक्ती वास्तवापासून दूर जाऊ लागते. यामुळे त्याचे दैनंदिन जीवन, काम आणि जबाबदाऱ्यांवर परिणाम होतो.
वैद्यकीय सल्ला आवश्यक
जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही अशी लक्षणे दिसत असतील, तर त्वरित मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. योग्य उपचार आणि समुपदेशनाने यावर मात करता येते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)