पण चीनमध्ये ही गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. सध्या सोशल मीडियावर चीनमधील एका महिलेची गोष्ट वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे, जिने चक्क आपल्या प्रेमाचा विमा उतरवला आणि 10 वर्षांनी तिला गुंतवणुकीच्या 50 पट परतावा मिळाला. काय आहे हे अजब 'लव्ह इन्शुरन्स' (Love Insurance) आणि चीन सरकारने यावर बंदी का घातली? जाणून घेऊया सविस्तर.
advertisement
चीनमधील 'वू' नावाच्या एका महिलेने 2016 मध्ये केवळ 199 युआन (सुमारे 2,300 रुपये) भरून एक अनोखी पॉलिसी खरेदी केली होती. जवळपास 10 वर्षांनंतर, जेव्हा तिने तिच्या त्याच प्रियकराशी लग्न केलं, तेव्हा कंपनीने तिला 10,000 युआन (सुमारे 1.15 लाख रुपये) परतावा म्हणून दिले. म्हणजेच तिने लावलेल्या पैशांच्या 50 पट जास्त रक्कम तिला मिळाली.
नेमकी काय होती ही 'लव्ह इन्शुरन्स' पॉलिसी?
2015-16 च्या सुमारास चीनमधील काही विमा कंपन्यांनी हा हटके प्रयोग केला होता. हा विमा आरोग्य किंवा मालमत्तेसाठी नसून तुमच्या 'रोमँटिक नात्यासाठी' होता. विशेषतः कॉलेजमधील तरुण जोडप्यांना डोळ्यासमोर ठेवून हा विमा विकला जात असे.
या विम्यामागील कल्पना साधी होती जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार दीर्घकाळ सोबत राहिलात आणि अखेर लग्न केलंत, तर तुम्हाला विमा कंपनीकडून मोठे आर्थिक बक्षीस मिळेल. पण, जर मधल्या काळात तुमचं ब्रेकअप झालं, तर तुमचे भरलेले पैसे बुडणार.
पॉलिसीच्या अटी होत्या खूपच कडक
या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या होत्या, ज्या पूर्ण करणं सोपं नव्हतं
वेळेची मर्यादा: पॉलिसी घेतल्यापासून किमान 3 वर्षांनंतर आणि कमाल 10 वर्षांच्या आत त्याच जोडीदाराशी लग्न करणे अनिवार्य होते.
3 वर्षांचा लॉक-इन पिरियड
जर तुम्ही पॉलिसी घेतल्यावर लगेच किंवा 3 वर्षांच्या आत लग्न केलं, तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. नातं किमान 3 वर्षं टिकवणं ही मोठी अट होती.
बक्षीस म्हणून काय मिळायचं?
जे जोडपे या कठीण अटी पूर्ण करायचे, त्यांना कंपनीकडून काही आकर्षक पर्याय दिले जायचे यामध्ये 10,000 युआन रोख रक्कम, अर्धा कॅरेटची हिऱ्याची अंगठी किंवा चक्क 10,000 गुलाबांची फुले.
कंपन्यांचा यात काय फायदा होता?
तुम्हाला वाटेल की विमा कंपन्या इतका मोठा परतावा देऊन स्वतःचं नुकसान का करून घेत होत्या? पण त्यामागे एक मोठं गणित होतं. कंपन्यांच्या अंतर्गत डेटानुसार, 98% कॉलेजमधील नाती ही 3 वर्षांच्या आत तुटतात. म्हणजेच, 97% लोकांचे प्रीमियम कंपनीकडेच जमा होणार होते आणि फक्त उरलेल्या 2% लोकांसाठीच कंपनीला पैसे द्यावे लागणार होते. हा कंपन्यांसाठी एक प्रकारचा 'कॅल्क्युलेटेड रिस्क' असलेला व्यवसाय होता.
सरकारने यावर बंदी का घातली?
हा 'लव्ह इन्शुरन्स' प्रकार चीनमध्ये प्रचंड गाजला, पण तिथल्या रेग्युलेटर्सना तो फारसा आवडला नाही. 2017-18 मध्ये चीन सरकारने यावर बंदी घातली. सरकारचं म्हणणं होतं की, हे विम्याचं उत्पादन नसून एक प्रकारचा 'जुगार' आणि मार्केटिंगचा फंडा आहे. विम्याचं काम संकटकाळात आधार देणं असतं, भावनांचा व्यापार करणं नाही, असं स्पष्ट करत सरकारने या पॉलिसी बंद केल्या.
चीनमधील 'वू' सारखी काही मोजकीच जोडपी नशीबवान ठरली ज्यांनी आपलं नातं लग्नापर्यंत नेलं आणि या पॉलिसीचा फायदा उठवला. आज ही पॉलिसी अस्तित्वात नसली तरी, "प्रेम टिकवणाऱ्यांना फळ मिळतं," याचं हे एक उत्तम उदाहरण मानलं जात आहे.
