सौंदर्यासाठी थप्पडचा वापर ज्याला स्लॅप थेरेपी असं म्हणतात. स्लॅप थेरपी ही ब्युटी थेरपी मानली जाते. कित्येक वर्षांपासून प्रचलित असलेली ही पद्धत. दक्षिण कोरियातील महिला सौंदर्यासाठी या थेरपीचा अवलंब करतात. सुरुवातीला ही थेरपी केवळ कोरियामध्ये वापरल्याचं दिसलं. पण आता ती जगभर पसरली आहे.
शॉर्ट सर्किटमुळे अभिनेत्रीने आपली दोन्ही मुलं गमावली, तुम्ही व्हा सावध, करू नका ही चूक
advertisement
दक्षिण कोरियातील लोकांचा असा विश्वास आहे की थप्पड मारल्याने चेहऱ्याच्या प्रत्येक भागात रक्ताभिसरण वाढतं. चेहऱ्याचे स्नायू कडक होतात. त्वचा अधिक घट्ट होते आणि आकर्षक दिसते. यामुळे त्वचा स्वच्छ दिसते आणि चेहरा चमकू लागतो. अमेरिकन लोकांचा असा विश्वास आहे की थप्पड मारल्याने त्वचेचे ओपन पोर्स आकुंचन पावण्यास मदत होते. यासोबतच ते त्वचेला क्रीम ऑइल चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत करते. यामुळे त्वचा गुळगुळीत होते आणि सुरकुत्या कमी होतात.
आता थप्पड मारणं म्हणजे गालावर रागात जोरात मारणं तसं नाही. तर दोन्ही हातांनी दोन्ही गाल मध्यम शक्तीने घासणं पुरेसं आहे. यासाठी लहानपणापासूनच त्याचा सराव केला जातो. या प्रक्रियेदरम्यान तुम्ही किती दाब देता याबद्दल काळजी घेणं आवश्यक आहे.
हात नाही, चमचा नाही, मग कसा खायचा भात? सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा VIDEO
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. या लेखात करण्यात आलेल्या दाव्याची पुष्टी न्यूज18मराठीने केलेली नाही. याचं समर्थन करत नाही किंवा तसं करण्यास प्रोत्साहन देण्याचाही उद्देश नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)