काय आहे वॉटर फास्टिंग : जल उपवास किंवा वॉटर फास्टिंगमध्ये अन्न सोडून सतत पाणी पिणे याचा समावेश आहे. ही फास्टिंग साधारणपणे 24 तास ते तीन दिवसांपर्यंत सुरु राहते. याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी आणि एकूणच आरोग्य चांगले राहण्यासाठी केला जातो.
Washing Machine : वॉशिंग मशीन वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर होऊ शकते फंगस, कपड्यांना येईल वास
advertisement
वॉटर फास्टिंग कसं सुरु करावं? : जल उपवास अधिकतर 24 ते 72 तासांपर्यंत सुरु असतो. याबाबतीत काही विशेष निर्देश देण्यात आलेले नाहीत. तसेच लोकांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता हा उपवास करायला नको.
वॉटर फास्टिंगचे फायदे : संशोधनात असे दिसून आले आहे की दीर्घकाळ वॉटर फास्टिंग केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. वॉटर फास्टिंगमुळे एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि जळजळ कमी करण्यास सुद्धा मदत होते. तसेच कॅलरीज इनटेक कमी झाल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते.
वॉटर फास्टिंग करण्याचे तोटे : वॉटर फास्टिंगमुळे अनेकदा निर्जलीकरण ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन होऊ शकते.