Washing Machine : वॉशिंग मशीन वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर होऊ शकते फंगस, कपड्यांना येईल वास
- Published by:Pooja Pawar
- trending desk
Last Updated:
अनेकांना कपडे धुण्याचा कंटाळा येतो, त्या लोकांसाठी वॉशिंग मशीन खूपच कामाची वस्तू ठरते. पण वॉशिंग मशीन वापरत असताना त्याची काळजी घेणंही गरजेचं असतं.
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणं खूप सोपं आहे, यामुळे वेळ व कष्ट दोन्हीही वाचतात. कोणतेही कष्ट न करता कपडे चमकतात आणि पटकन काम आटोपतं. आजकाल बऱ्याच घरांमध्ये वॉशिंग मशीन असतात. खरं तर वॉशिंग मशिनच्या शोधामुळे माणसाची कपडे धुण्याच्या त्रासातून सुटका झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अनेकांना कपडे धुण्याचा कंटाळा येतो, त्या लोकांसाठी वॉशिंग मशीन खूपच कामाची वस्तू ठरते. पण वॉशिंग मशीन वापरत असताना त्याची काळजी घेणंही गरजेचं असतं.
आपल्या घरात इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्या की आपल्याला त्याचं वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घ्यावं लागतं. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूची काळजी घेणं आवश्यक असतं, त्याचप्रमाणे वॉशिंग मशीनचीही विशेष काळजी घ्यावी लागते, नाहीतर ते खराब होऊ शकतं किंवा आपले कपडे खराब होऊ शकतात. पावसाळ्यात कपडे नीट न सुकल्यास त्यातून दुर्गंधी येते. त्यामुळे पावसाळ्यात वॉशिंग मशिनची योग्य काळजी न घेतल्यास त्यात फंगस लागण्याचा धोका असतो. फंगसबरोबरच अशी परिस्थिती देखील असू शकते ज्यामुळे कपड्यांना वास येऊ लागतो. पावसाळ्यात कपडे धुताना कोणती चूक करायची नाही ते जाणून घेऊयात.
advertisement
सेमी-ऑटोमॅटिक असो वा ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन असो, कपडे धुतल्यानंतर प्रत्येकाने एका गोष्टीची खास काळजी घेणं आवश्यक आहे. पावसाळ्यात कपडे धुतल्यानंतर लगेच वॉशिंग मशीनचं झाकण कधीही बंद करू नये. कपडे धुतल्यानंतर मशिनच्या ड्रममध्ये मॉइश्चर राहतं आणि पावसाळ्यात त्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं. त्यामुळे वॉशिंग मशिनचे झाकण अचानक बंद केल्यास ड्रममध्ये फंगस तयार होण्याचा धोका असतो आणि दुर्गंधी देखील येऊ लागते. यानंतर जेव्हा तुम्ही त्यात कपडे धुण्यासाठी टाकता तेव्हा कपड्यांमधून वास येण्याची शक्यता असते. त्यामुळे कपडे धुतल्यानंतर झाकण थोडा वेळ उघडं ठेवावं जेणेकरुन थोडी हवा आत जाऊ शकेल आणि ड्रम पूर्णपणे कोरडा होऊ शकेल.
advertisement
फिल्टरवर लक्ष देणं गरजेचं :
ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनच्या आत एक फिल्टर लावलेला असतो, त्यामुळे कपडे धूत असताना ते धागे, कपड्याचं सूत कापसाच्या स्वरूपात गोळा होतात. त्यामुळे कपडे धुण्यापूर्वी फिल्टर आठवणीने स्वच्छ करा. जेणेकरून तुमची लाँड्री व्यवस्थित स्वच्छ होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 06, 2024 2:47 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Washing Machine : वॉशिंग मशीन वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर होऊ शकते फंगस, कपड्यांना येईल वास