कोणती आहेत झाडे?
वड, पिंपळ,आवळा, बेल आणि उंबराच झाड आपल्या परिसरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा असेल त्या ठिकाणी लावून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी पावलं उचलले पाहिजेत,असं मुरलीधर बेलखोडे सांगतात.
नपुंसकता, अशक्तपणा करते दूर; आजारांचा जणू यमराज आहे ही वनस्पती
काय आहेत फायदे?
वड : (वटवृक्ष) वडाचं झाड सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन देणारा आहे. आणि सदाहरित आहे. त्याचे आयुर्वेदामध्ये गुणवैशिष्ट्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्याचे जर मूळ उगाळून आपण प्रशन केलं तर कफ सर्दी पासून संरक्षण होऊ शकतं असं सांगितलं जातं.
advertisement
पिंपळ : पिंपळाच्या झाड सुद्धा आयुर्वेदामध्ये सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे. सदा हरित हे सुद्धा आहे. आणि असंख्य पक्षी त्याच्यावर बसतात. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये त्याचं अनगिणत तसे महत्त्व आहे. त्याच्या पानापासून, त्यांच्या फळापासून, त्यांच्या मुळापासून विविध प्रकारच्या औषधी होतं. आणि ते मानवाच्या आरोग्यास हितकारक आहे.
लालचुटूक सफरचंदासारखी रेड बेरी अत्यंत गुणकारी; अंगदुखी करते झटक्यात बरी
उंबर : उंबराच झाड आपण कुठले लग्न प्रसंग असेल तर त्याची काडी लावली जाते. म्हणजे कुटुंब मोठं होत असल्याचा संदेश दिला जातोय. आपलं कुटुंब जसे मोठा होत जाईल अशा पद्धतीप्रमाणे संदेश देणारं हे झाड आहे. आणि जलसंवर्धनाकरता उंबराच झाड सर्वात महत्त्वाचं आहे. आपल्या मुळामध्ये पाणी धरून ठेवतो. आणि जेवढे आवश्यक पाणी आहेत म्हणजे विहीर, बोरवेल त्याकरता पाणी संग्रह करून ठेवण्याचं काम उंबर करत असतात. त्याचे औषधी गुणधर्म देखील आहेत या झाडापासून त्याच्या फळापासून अनेक औषधी देखील बनविला जातात.
बेल : बेलाचे देखील आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदे आहेत.त्यामुळे बेलाचे झाड देखील आपल्या परिसरामध्ये लावणं गरजेचं आहे. आपण बेलाच्या झाडाचं पूजना करिता वापर करतो त्याचा फळ देखील आरोग्यासाठी हितकारक आहे कफनाशक म्हणून त्याचा वापर केला जातो त्वचेच्या आजारांसाठी बेलाचा उपयोग वैद्य औषध म्हणून सांगत असतात.
भाजी स्वादिष्ट, पानं गुणकारी; रक्तदाब, मधुमेह ठेवतात नियंत्रणात
आवळा : आवळा सुद्धा बहुगुणी आहे त्याच्यापासून मुरब्बा देखील बनविला जाऊ शकतो जो आपल्या पचनसंस्थेसाठी हितकारक मानला जातो. लहान मुलांना जनता वगैरे झाले असल्यास आवळ्याचा औषध दिलं जातं. त्यामुळे हे पाचही झाडे आपल्या सभोवताली असणार अत्यंत गरजेचं आहे,अशी माहिती मुरलीधर बेलखोडे यांनी दिलीय.