लालचुटूक सफरचंदासारखी रेड बेरी अत्यंत गुणकारी; अंगदुखी करते झटक्यात बरी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
बेरीमध्ये भरपूर प्रमाणात साखर असल्याने ती खाल्ल्या खाल्ल्या शरिरात ऊर्जा निर्माण होते. शिवाय या फळामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात.
हिमांशू जोशी, प्रतिनिधी
पिथोरगड, 30 नोव्हेंबर : लहान लहान लालचुटूक सफरचंदासारखी दिसणारी रेड बेरी कोणाला नाही आवडत. चवीला हे फळ अत्यंत स्वादिष्ट असतं. त्याला Pyracantha crenulata असंही म्हणतात. हे फळ चवीला जितकं छान असतं तितकेच त्याचे औषधी फायदेही आहेत.
विशेषतः उत्तराखंडमध्ये मिळणारी रेड बेरी अंगदुखीवर गुणकारी असते. यावर औषधं बनवण्यासाठी बेरीच्या वनस्पतीचा वापर केला जातो. आयुर्वेदिक डॉक्टर मनोज जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेरीचं रोप मुळापासून फळं आणि फुलांपर्यंत गुणकारी असतं.
advertisement
डोंगराळ भागात बेरीची अनेक झाडं आढळतात. त्यामुळे इथले शालेय विद्यार्थी शाळा सुटल्यावर चिंचा, बोरं खावी तशी बेरी खातात. या फळापासून चुर्णदेखील बनवलं जातं. शिवाय बेरीमध्ये भरपूर प्रमाणात साखर असल्याने ती खाल्ल्या खाल्ल्या शरिरात ऊर्जा निर्माण होते. शिवाय या फळामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात.
advertisement
बेरीच्या फांद्या काटेरी आणि पानांचा रंग गडद असतो. तिच्या फांदीचा वापर दात घासण्यासाठी केला जातो. त्यामुळे दातदुखीवर, हिरड्यांच्या समस्येवर आराम मिळतो. तर बेरी फळं आणि पानांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लामेट्री गुणधर्म असतात. ज्यामुळे हृदयरोगावर, उच्च रक्तदाबावर आणि मधुमेहावर आराम मिळतो. या रोपातील औषधी गुणधर्मांमुळे शरिरातलं हानीकारण कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासही मदत मिळते.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
Location :
Pithoragarh,Uttarakhand
First Published :
November 30, 2023 3:21 PM IST