2 लाखांहून अधिक चौरस किलोमीटरचा भारत आपल्या टाचेखाली दाबणाऱ्या ब्रिटिशांना या एका चिमुकल्या राज्यावर कधीच हुकूमत गाजवता आली नाही. ते राज्य म्हणजे आपलं लाडकं 'गोवा'. चला तर मग, आज जाणून घेऊया की अख्खा देश ताब्यात घेणाऱ्या इंग्रजांना गोव्याने कसं रोखून धरलं होतं.
गोव्यावर ब्रिटिशांचं राज्य का नव्हतं?
इंग्रजांनी भारतावर राज्य केलं, इथली संपत्ती लुटली, पण गोव्याच्या वाटेला ते कधीच गेले नाहीत. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पोर्तुगीज.
advertisement
जेव्हा इंग्रज 1608 मध्ये व्यापारासाठी सुरतमध्ये पाऊल ठेवत होते, तेव्हा पोर्तुगीज आधीपासूनच भारतात स्थिरावले होते. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने 1498 मध्ये भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधला आणि तेव्हापासूनच गोव्यावर पोर्तुगीजांची पकड मजबूत झाली होती.
पोर्तुगीजांसाठी गोवा हे केवळ एक राज्य नव्हतं, तर ते त्यांच्या व्यापाराचं मुख्य केंद्र आणि एक अभेद्य किल्ला होता. इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यात वर्चस्वासाठी अनेकदा लढाया झाल्या, पण गोव्यातून पोर्तुगीजांना हाकलून देणं इंग्रजांना कधीच जमलं नाही. इंग्रजांनी जेव्हा संपूर्ण भारतावर आपली सत्ता प्रस्थापित केली, तेव्हा त्यांनी पोर्तुगीजांशी असलेल्या संबंधांमुळे आणि गोव्याच्या भौगोलिक रचनेमुळे तिथे हस्तक्षेप न करणं डोकसपणाचं मानलं. जिथे इंग्रजांनी 200 वर्ष राज्य केलं, तिथे पोर्तुगीजांनी तब्बल 450 वर्ष गोव्यावर आपली सत्ता टिकवून धरली होती.
भारत स्वतंत्र झाला, पण गोवा नाही
अनेकांना वाटतं की 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा गोवा ही स्वतंत्र झाला असेल, पण तसं नव्हतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही १४ वर्ष गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. अखेर 1961 मध्ये भारतीय लष्कराने 'ऑपरेशन विजय' राबवले आणि पोर्तुगीजांना माघार घेण्यास भाग पाडले. त्यानंतरच गोवा हा खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग बनला. आज आपण गोव्यात फिरताना तिथल्या वास्तूंवर आणि संस्कृतीवर जो युरोपियन प्रभाव पाहतो, तो इंग्रजांचा नसून पोर्तुगीजांचा आहे. इतिहासातील ही रंजक गोष्ट गोव्याच्या सौंदर्याला एक वेगळीच ओळख मिळवून देते.
