हिवाळ्यात मेथीचे दाणे, दही, मध, नारळ तेल, कोरफड याचा वापर करुन केसांची निगा राखणं उपयुक्त ठरतं. या नैसर्गिक घटकांमुळे केसांमधला कोरडेपणा कमी होतो आणि या घटकांच्या नियमित वापरानं केसांमधे आर्द्रता कायम राहते.
मेथीचे दाणे - मेथीच्या दाण्यांमधे प्रथिनं आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. हे गुणधर्म केसांसाठी खूप फायदेशीर असतात. निस्तेज केसांसाठी, मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा आणि नंतर ते तुमच्या टाळूला लावा. हे लावण्यासाठी कापसाचा वापर करू शकता. यामुळे केस मुळांपासून मजबूत आणि काळे होतात.
advertisement
Banana: केळ रोज खावं का ? केळ खाल्ल्यानं वजन कमी होतं का ? रोज किती केळी खावीत ?
दह्यासोबत मध - हिवाळ्यातही केसांवरची चमक आणि मऊपणा कायम राहावा यासाठी दही आणि मध फायदेशीर ठरू शकतात. यासाठी एका लहान भांड्यात दही घ्या आणि त्यात मध पूर्णपणे मिसळा. नंतर ते केसांना हेअर मास्क म्हणून लावा आणि थोड्या वेळानं धुवा. यामुळे कोरडे केस चमकदार आणि मऊ होऊ शकतात.
नारळ तेल आणि कोरफड - हिवाळ्यात, थंड हवेमुळे केसांचा ओलावा हिरावून घेतला जातो. कोरड्या केसांत, ओलावा निर्माण करण्यासाठी नारळ तेल आणि कोरफड अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. हे करण्यासाठी, एका भांड्यात कोरफडीचा गर आणि नारळाचं तेल मिसळा. ही पेस्ट तुमच्या टाळूपासून केसांच्या टोकापर्यंत लावा. यामुळे तुमचे केस हायड्रेट होतील आणि हळूहळू कोरडेपणा दूर होईल.
Winter Care : फाटलेल्या ओठांवर जालीम उपाय, या लिपबामनं ओठ दिसतील मऊ, गुलाबी
कोरफड गर आणि दही - निस्तेज आणि कोरड्या केसांना चमक देण्यासाठी कोरफड गर आणि दही वापरू शकता. दोन चमचे कोरफड गर दोन चमचे दह्यात मिसळा. हा हेअर मास्क केसांना लावा आणि अर्धा तास तसंच राहू द्या. नंतर, केस स्वच्छ पाण्यानं धुवा. यामुळे केस मॉइश्चरायझ होतील आणि ते पूर्वीपेक्षा अधिक चमकदार होतील.
