TRENDING:

Winter Care : घरी तयार केलेलं तेल वापरा, हिवाळ्यातल्या कोरड्या हवेत केस राहतील मऊ

Last Updated:

हिवाळ्याच्या काळात, थंड हवेमुळे केस कोरडे होऊ शकतात. यासाठी घरी एक तेल तयार करणं शक्य आहे. बदलत्या हवामानात, केस चांगले राहावेत यासाठी हे तेल उपयुक्त आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळा सुरु झालाय आणि कोरड्या आणि थंड वाऱ्यामुळे त्वचेवर परिणाम लगेच जाणवू शकतात. कोरड्या हवेमुळे केसंही कोरडे होऊ शकतात.
News18
News18
advertisement

एरवीही आणि हिवाळ्यात केस तुटणं, कोंडा, केस कोरडे होणं यासारख्या समस्या जास्त जाणवतात. काही वेळा हवामान, पण त्याचबरोबर जीवनशैलीतल्या चुकीच्या सवयी, खाण्याच्या सवयी, ताणतणाव आणि चिंता यामुळे परिणाम जाणवतो.

हिवाळ्याच्या काळात, थंड हवेमुळे केस कोरडे होऊ शकतात. यासाठी घरी एक तेल तयार करणं शक्य आहे. बदलत्या हवामानात, केस चांगले राहावेत यासाठी हे तेल उपयुक्त आहे.

advertisement

Eggs : संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे ? रोज अंडी खावीत का ? किती खावीत ?

केरळमधील काव्या यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमधे त्यांनी याविषयीची माहिती दिली आहे. हे तेल बनवायला खूप सोपं आहे. यात कोणतंही रसायन वापरलं जात नाही.

हे तेल बनवण्यासाठी नारळ तेल, ⁠मेथीचे दाणे, ⁠कढीपत्ता, कोरफड गर, ⁠तुळशीची पानं, ⁠आवळा हे साहित्य आवश्यक आहे.

advertisement

हे तेल बनवण्यासाठी, एका पॅनमधे एक कप खोबरेल तेल गरम करा. नंतर त्यात मेथीचे दाणे, कढीपत्ता, आवळा, तुळस आणि कोरफडीचा गर घाला. हे तेल रंग बदलेपर्यंत उकळवा. नंतर ते थंड करा आणि एका भांड्यात ठेवा. जास्त काळ टिकण्यासाठी तुम्ही त्यात काळी मिरी देखील घालू शकता.

Uric Acid : या भाज्या करतील युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी, महत्त्वाच्या डाएट टिप्स

advertisement

हे तयार केलेलं तेल तुम्ही झोपण्यापूर्वी किंवा केस धुण्यापूर्वी लावू शकता. चांगल्या परिणामांसाठी, आठवड्यातून दोनदा ते लावण्याचा प्रयत्न करा. या तेलात असलेल्या घटकांमध्ये फॅटी एसिड, व्हिटॅमिन ई, प्रथिनं, निकोटिनिक एसिड, व्हिटॅमिन बी, बीटा-कॅरोटीन, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरून सुचली कल्पना, बनवला भन्नाट मोबाईल बेल्ट, 7 लाख रुपयांची कमाई
सर्व पहा

हे तेल लावल्यानं केस निरोगी राहतातच पण ते लांब, जाड आणि काळे देखील होतात. केसांची वाढ होण्यासाठी हे तेल उपयुक्त आहे आणि कोरडेपणाही दूर होतो. याशिवाय, हे तेल केस गळणं, कोंडा आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Care : घरी तयार केलेलं तेल वापरा, हिवाळ्यातल्या कोरड्या हवेत केस राहतील मऊ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल