TRENDING:

Skin Care : हिवाळ्यात त्वचा कोरडी का होते ? त्वचेचा पोत चांगला राहण्यासाठी काय करायचं ?

Last Updated:

हिवाळ्यात त्वचा खरखरीत होणं यासाठी बाह्य उपचारांबरोबरच आतून इलाज करणं गरजेचं आहे. योग्य अन्नामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होऊ शकते. काही फळं आणि भाज्यांमधे भरपूर पोषक तत्वं असतात. या पोषक घटकांमुळे त्वचा नैसर्गिकरित्या स्वतःची दुरुस्ती करु शकते आणि ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळा म्हटलं की थंड आणि कोरडी हवा. या हवेमुळे अनेकांची त्वचा कोरडी, खरखरीत होते.  यावर उपाय म्हणून मॉइश्चरायझर्स आणि क्रीम लावणं हा तात्पुरता इलाज आहे.
News18
News18
advertisement

हिवाळ्यात त्वचा खरखरीत होणं यासाठी बाह्य उपचारांबरोबरच आतून इलाज करणं गरजेचं आहे. योग्य अन्नामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होऊ शकते. काही फळं आणि भाज्यांमधे भरपूर पोषक तत्वं असतात. या पोषक घटकांमुळे त्वचा नैसर्गिकरित्या स्वतःची दुरुस्ती करु शकते आणि ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.

Retro Walking: रेट्रो वॉकिंग म्हणजे काय ? प्रकृतीवर याचा काय परिणाम होतो ?

advertisement

हिवाळ्याच्या काळात त्वचा मऊ राहावी यासाठी काही फळं आणि भाज्या खाण्याचा सल्ला त्वचा तज्ज्ञ देतात. केवळ त्वचेसाठी नाही तर आरोग्यासाठीही हे फायदेशीर ठरतं. त्वचेचा नैसर्गिक थर पुरेसा ओलावा टिकवून ठेवू शकत नाही तेव्हा त्वचा कोरडी होते. थंड हवामान, कमी आर्द्रता, गरम पाण्यानं आंघोळ आणि कोणता साबण  वापरता यावर अवलंबून असतं.

advertisement

गरम पाणी आणि कडक साबणानं जास्त वेळ आंघोळ केल्यानं त्वचेतलं नैसर्गिक तेल निघून जातं, त्वचेचा थर कमकुवत होतो आणि खडबडीत होतो आणि त्वचेवर खाज सुटणारे ठिपके निर्माण होतात.

व्हिटॅमिन ए - त्वचेच्या पेशींचं पुनरुज्जीवन आणि दुरुस्तीसाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे. यामुळे त्वचा साेलून निघत नाही, त्वचेचा पोत सुधारतो आणि कोरडे डाग बरे करण्यास मदत होते. व्हिटॅमिन ए साठी, गाजर, पालक आणि केळी खाणं चांगलं.

advertisement

व्हिटॅमिन सी - अतिनील किरणं आणि मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसान यामुळे त्वचेचं होणारं नुकसान यामुळे रोखलं जातच तसंच सुरकुत्या कमी करायला मदत होते, त्वचेचा रंग उजळतो, सूज कमी होते आणि कोलेजन उत्पादन वाढवण्यासाठीही मदत होते. संत्री, लिंबू, स्ट्रॉबेरी आणि ब्रोकोलीत व्हिटॅमिन सी असतं. यामुळे कोलेजन तयार करण्यास मदत होते आणि त्वचेतला ओलावा कायम ठेवायला मदत होते.

advertisement

Obesity: लठ्ठपणा टाळा, आयुष्य वाढवा, लठ्ठपणामुळे होतंय शरीराचं मोठं नुकसान

व्हिटॅमिन ई - व्हिटॅमिन ई हे एक महत्त्वाचं चरबी-विरघळणारे अँटिऑक्सिडंट आहे. एवोकॅडो, बदाम, सूर्यफुलाच्या बिया आणि ब्रोकोलीत व्हिटॅमिन ई असतं. यामुळे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत होते.

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठीच्या टिप्स -

हिवाळ्यात दिवसातून किमान दोन-तीन लीटर पाणी प्या.

आहारात बदाम, जवस आणि सूर्यफुलाच्या बिया असू द्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

त्वचेला विश्रांती आणि टवटवीतपणा मिळावा यासाठी पुरेशी झोप घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : हिवाळ्यात त्वचा कोरडी का होते ? त्वचेचा पोत चांगला राहण्यासाठी काय करायचं ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल