बद्धकोष्ठतेच्या समस्येवर वेळीच लक्ष दिलं नाही तर इतर अनेक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी साधे आणि प्रभावी उपाय योग आणि आयुर्वेदात उपलब्ध आहेत.
या संदर्भात, योग तज्ज्ञ खुशी बाजवा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सोपी दिनचर्या शेअर केली आहे, यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होऊ शकते.
कोमट लिंबू पाणी आणि मलासन - सकाळी सर्वात आधी कोमट पाणी प्या, त्यात लिंबाचा रस घाला आणि हळूहळू प्या. यामुळे पोट स्वच्छ होतं आणि पचन सुधारतं. हे पाणी पिताना, मलासनात बसा. या आसनामुळे पोटावर हलका दाब पडतो, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि बद्धकोष्ठता कमी होते.
advertisement
Sleep : चांगल्या झोपेसाठी सुपर रेसिपी, या आयुर्वेदिक उपायानं लागेल गाढ झोप
कटी चक्रासन आणि त्रिय्यक भुजंगासन - कोमट पाणी प्यायल्यानंतर, शरीराला हलका ताण देणं महत्वाचं आहे. हे करण्यासाठी, कटी चक्रासन करा, ज्यात तुमची कंबर डावीकडे आणि उजवीकडे फिरवणं समाविष्ट आहे. या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक होतो आणि पोटाचे स्नायूं सक्रिय राहतात. यानंतर त्रिय्यक भुजंगासन करा. यात भुजंगासन (कोब्रा पोज) करा आणि शरीर उजवीकडे आणि डावीकडे वळवा. यामुळे पोटाला चांगला ताण मिळतो आणि पचनास मदत होते.
मालासन आणि पवनमुक्तासन - शेवटी, पुन्हा मलासन करा, पण यावेळी, एक पाय बाजूला वाकवा आणि शरीराला विरुद्ध दिशेनं वळवा. थोडा वेळ थांबा. यामुळे आतड्यांवर हलका दबाव येतो. यानंतरही आराम मिळत नसेल तर पवनमुक्तासन करून पहा. यात पाठीवर झोपणं, पाय वाकवणं आणि गुडघे छातीकडे ओढणं अशा क्रिया आहेत. गॅस आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी हे एक अतिशय प्रभावी योगासन आहे.
Digestion : जेवणानंतरच्या पचनासाठी सोप्या टिप्स, या बिया करतील पचन सुकर
या टिप्स देखील उपयुक्त ठरू शकतात -
योगाव्यतिरिक्त, खुशी बाजवा यांनी सकाळी भिजवलेले काजू आणि हंगामी फळं खाण्याचा सल्ला दिला आहे.
जिरं, बडीशेप आणि ओवा मिसळलेलं कोमट पाणी प्या.
दररोज किमान वीस-तीस मिनिटं योगा करा किंवा चालायला जा.
झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्या. या सर्वांव्यतिरिक्त, आहारात एक चमचा तूप नक्की समाविष्ट करा. केवळ सात दिवस नियमितपणे या सवयी पाळल्या तर बद्धकोष्ठतेची समस्या लक्षणीयरीत्या कमी होईल.