मात्र हेच पुन्हा-पुन्हा गरम केलेलं तेल तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे तुम्हालाही ही सवय असेल, तर डॉक्टरांचं मत ऐकणं गरजेचं आहे.
पुन्हा गरम केलेलं तेल का हानिकारक आहे?
दिल्लीच्या श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे सीनियर कन्सल्टंट (इंटरनल मेडिसिन) डॉ. अरविंद अग्रवाल सांगतात की, तेलाला वारंवार गरम केल्यास त्यामध्ये हानिकारक केमिकल्स, ट्रान्स फॅट्स आणि फ्री रॅडिकल्स तयार होतात. हे पदार्थ शरीरात गेल्यावर हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर, कर्करोग अशा गंभीर आजारांचा धोका वाढतो.
advertisement
पचनसंस्थेवर परिणाम
या प्रकारचं तेल पचायला कठीण असतं. यामुळे पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी यांसारख्या समस्या होण्याची शक्यता असते.
चव, गंध आणि रंगही बिघडतो
जुने तेल फक्त आरोग्यासाठीच खराब नाही, तर चव, रंग, आणि सुगंध देखील खराब करतं. अशा जेवणाचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. काही वेळा तर अशा तेलात जीवाणू आणि विषारी घटक तयार होतात, जे अन्नात मिसळून आपली तब्येत बिघडवू शकतात.
ताजं तेल वापरा, आरोग्य जपा
त्यामुळे आरोग्य तज्ञ सांगतात की, नेहमी ताजं तेल वापरावं आणि एकदाच वापरलेलं तेल परत गरम करून वापरणं टाळावं. ही सवय तुमचं आरोग्य दीर्घकाळ टिकवण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.