शौचालय आणि मोबाईलच्या सवयीचे 6 दुष्परिणाम
मूळव्याध होण्याचे मुख्य कारण
कमोडवर जास्त वेळ बसल्याने गुदाशयाच्या नसांवर दाब वाढतो. या दाबामुळे त्या नसांना सूज येते, ज्यामुळे मूळव्याध होतो. डॉ. अमोल वाघ यांनी, मोबाईलच्या अतिरेकामुळे नेमके काय परिणाम होतात हे सांगितले आहे. डॉक्टरांच्या मते, सतत स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो तसेच, झोपेचा त्रास, मानेत व पाठीत वेदना आणि मानसिक तणाव वाढतो.
advertisement
बद्धकोष्ठतेची समस्या
जेव्हा तुम्ही मोबाईलवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा शौचास लागलेला नैसर्गिक दाब तुम्ही टाळता. यामुळे आतड्यांचे काम मंदावते आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.
'ब्लॅक होल सिंड्रोम'
मोबाईल वापरताना वेळेचे भान राहत नाही. 10-15 मिनिटांसाठी गेलेली व्यक्ती अर्धा तास किंवा त्याहून अधिक वेळ तिथेच बसून राहते. यालाच काही डॉक्टर गंमतीने 'ब्लॅक होल सिंड्रोम' म्हणतात, जे मूळव्याधाचे प्रमुख कारण आहे.
स्वच्छतेचा अभाव
शौचालयामध्ये बॅक्टेरिया आणि जंतू मोठ्या प्रमाणात असतात. मोबाईल सोबत घेऊन गेल्याने हे जंतू फोनवर जमा होतात, जे नंतर बाहेरही आपल्यासोबत जातात आणि संसर्गाचा धोका वाढवतात.
पचनसंस्थेवर परिणाम
शौचालयात जास्त वेळ बसल्याने शरीराच्या खालच्या भागावर दाब वाढतो. यामुळे पचनसंस्थेवर ही परिणाम होऊ शकतो.
नैसर्गिक चक्र बिघडते
शौचाच्या नैसर्गिक प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, मोबाईलमुळे तुमचे लक्ष विचलित होते. यामुळे शरीराचे नैसर्गिक चक्र बिघडते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)