या दुकानात हेयर क्लिप्सची सुरुवात केवळ 3 रुपयांपासून होते. विशेषतः पारंपरिक डिझाईन्समध्ये तयार करण्यात आलेल्या चाफ्याच्या फुलांच्या क्लिप्स 120 रुपये डझन, म्हणजे एका क्लिपची किंमत अवघी 10 रुपये इतकी आहे. हीच क्लिप्स बाजारात 20 ते 30 रुपयांना विकली जातात. याशिवाय थोड्याशा फॅन्सी लुकमध्ये चाफ्याच्या क्लिप्स 360 रुपये डझन दरातही येथे उपलब्ध आहेत.
advertisement
वाणितामध्ये जास्वंदीसारख्या फुलांच्या देखील सुंदर क्लिप्सचे कॉम्बो मिळतात. हे कॉम्बो 720 रुपये डझन दरात असून त्यात मेट, पाणी रंग अशा विविध रंगसंगतीत क्लिप्स उपलब्ध आहेत. ट्रेंडी आणि एंटीक लुकमध्ये फळांच्या डिझाईन्सच्या क्लिप्स देखील येथे मिळतात. हे कॉम्बो 6 पीससाठी 360 रुपये या दरात मिळतात.
या दुकानातील सर्व क्लिप्स फायबर आणि अॅक्रिलिक मटेरियलमध्ये बनवलेल्या आहेत, त्यामुळे त्या पडल्या तरी सहज तुटत नाहीत. येथे प्रचंड वेरायटी, विविध रंग आणि डिझाईन्सचा मोठा संग्रह उपलब्ध आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे येथे केवळ होलसेल खरेदीच करता येते. रिटेलमध्ये माल मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही छोट्या किंवा मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर वाणिता हेयर अॅक्सेसरीज हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे मिळणाऱ्या परवडणाऱ्या दरात तुम्ही सहजपणे मुनाफा मिळवणारा व्यवसाय सुरू करू शकता.
हे दुकान मालाड पश्चिमेतील क्रिस्टल प्लाझामध्ये दुकान क्रमांक 35 आणि 36 येथे स्थित आहे. हेयर अॅक्सेसरीजमध्ये ट्रेंड, क्वालिटी आणि व्यवसाय संधी एकत्र पाहणाऱ्यांसाठी वाणिता एक परफेक्ट डेस्टिनेशन ठरत आहे.