TRENDING:

Diwali Shopping : दिवाळीसाठी लयभारी कुर्ती, स्वस्तात मस्त होईल खरेदी, पुण्यातील हे ठिकाण माहितीये का?

Last Updated:

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून, बाजारपेठांमध्ये सणाच्या खरेदीची लगबग दिवसेंदिवस वाढत आहे. 1 वर्षाच्या मुलापासून ते 14 वर्षाच्या मुलांपर्यंत सर्व प्रकारचे कुर्ते याठिकाणी मिळतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून, बाजारपेठांमध्ये सणाच्या खरेदीची लगबग दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील शनिपार चौकातही या सणानिमित्त ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. पारंपरिक आणि आधुनिक डिझाईनच्या कुर्त्यांना येथे विशेष मागणी वाढली आहे. शनिपार चौकात असलेल्या वेस्ट झोन या प्रसिद्ध दुकानात ग्राहकांची विशेष गर्दी होत असून, पुणेकरांच्या आवडीचा हा ठिकाण बनला आहे. याबद्दलची अधिक माहिती अनिकेत कोंढाळकर यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement

या दुकानाचे मालक अनिकेत कोंढाळकर सांगतात की, प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काळात पुणेकर पारंपरिक पोशाखांकडे विशेष आकर्षित होतात. त्यामुळे या वर्षीदेखील विविध प्रकारच्या रंग, कापड आणि डिझाईनचे कुर्ते ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व कुर्ते स्थानिक कारागिरांनी तयार केलेले असून, गुणवत्तेच्या दृष्टीने उत्कृष्ट आहेत.

Pune Tourism: दिवाळीत फिरायला जायचा प्लॅन करताय? तर पुण्यातील या ठिकाणांना नक्की द्या भेट

advertisement

नीलेश कोंढाळकर यांनी 2008 पासून कुर्ते तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला असून, गेल्या दीड दशकात त्यांनी स्वतःचा ब्रँड उभा केला आहे. त्यांच्या कारखान्यात अनुभवी शिंपी आणि डिझायनर्स कार्यरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक हातकलेचा संगम घडवून आणत त्यांनी स्थानिक बाजारपेठेसह महाराष्ट्रभर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिवाळी स्पेशल कलेक्शन बाजारात आणण्यात आले आहे. विविध ट्रेंडी रंगसंगतीतील कुर्ते, नेहरू जॅकेट, तसेच कुटुंबासाठी फॅमिली मॅचिंग सेट्स या संकल्पनेलाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

advertisement

कोणत्या कुर्त्यांना विशेष मागणी

सध्या दिवाळीच्या निमित्ताने लखनवी, स्ट्रेट कट कुर्ता, चेकर्ड,ताम्हण प्रिंट अशा विविध प्रकारच्या कुर्त्यांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

किंमत काय आहे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

1 वर्षाच्या मुलापासून ते 14 वर्षाच्या मुलांपर्यंत सर्व प्रकारचे कुर्ते याठिकाणी मिळतात. 36 साईझ पासून ते 52 साईझ पर्यंतचे कुर्ते याठिकाणी मिळतात. इकॉनॉमी मध्ये 690 रुपयांपासून ते 990 रुपयांपर्यंत तर इम्पोर्टेड मध्ये 1200 रुपयांपासून 2290 रुपयांपर्यंत किमतीचे कुर्ते येथे मिळतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali Shopping : दिवाळीसाठी लयभारी कुर्ती, स्वस्तात मस्त होईल खरेदी, पुण्यातील हे ठिकाण माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल