देवी सजावट, ओट भरणीसाठी लागणारे हळदीकुंकू, करंडा, रुमाल, फुले, भांडी आदी वस्तू फक्त 10 रुपयांपासून या ठिकाणी मिळतात. त्यात जे देवीचे मुखवटे मार्केटमध्ये 200 रुपयांपासून स्टार्ट आहेत ते याठिकाणी फक्त 50 रुपयांपासून मिळतात. त्यामुळे या ठिकाणी येऊन तुम्ही स्वस्तात खूप छान खरेदी करू शकता. हे फक्त मार्गशीर्ष महिन्यातच बघायला मिळेल. पूर्ण मार्केट फिरून वेळ फुकट घालण्यापेक्षा या ठिकाणी येऊन तुम्ही अनेक वस्तू ज्या कमी रेंजमध्ये विकत घेऊ शकता.
advertisement
सोशल मीडियावरील ब्युटी टिप्स वापरताय? तर आताच थांबा ही सवय, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण दिवस आणि पूर्ण वेळ पारस नोव्हेल्टी ओपन असल्याने कोणत्याही वेळी जाऊन तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. काही महिलांना उद्यापनात वस्तू घेणे परवडत नाही, त्या सामान्य महिलांपासून सर्वांसाठी या दिवसात कमी भावात वस्तू देत असल्याचे परेश नागडा यांनी सांगितले.
गेल्या 15 वर्षांपासून ते ही कमी भावात वस्तू देण्याची सेवा करत आहेत. मार्केटमध्ये 10 रुपये किंमत असेल तर ते 5 रुपयात या ठिकाणी देतात. त्यामुळे ग्राहक यावेळी मोठ्या प्रमाणात येऊन वस्तू खरेदी करतात. ग्राहकांचे समाधान हेच त्यांचे समाधान असल्याचे ते म्हणतात. त्यामुळे देवीसाठी खरेदी करण्यासाठी मोहन्यामध्ये या ठिकाणाला नक्कीच भेट देऊन बघा.





