TRENDING:

महायुती सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी कर्जाच्या वसुलीवर 1 वर्षाची स्थगिती!

Last Updated:

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.   

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या भागांमध्ये पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या शेतीसाठीच्या कर्ज वसुलीस एक वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या मागणीला अखेरीस यश आले आहे. तसंच  सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्याचेही आदेश सरकारने दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
advertisement

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालं. मराठवाड्यात आणि सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालं. राज्य सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं. पुढील वर्षी जुलैपर्यंत कर्जमाफीची घोषणा होणार आहे. पण, तसं असलं तरी शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीचा तगादा सुरू असल्याचा प्रकार समोर आला.

advertisement

त्यामुळे पुर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठया प्रमाणात नुकसान झाल्यानं दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.

काय दिले सरकारने आदेश?

राज्यामध्ये जून ते सप्टेंबर, २०२५ या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पिक आणि शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पशुहानी, मनुष्यहानी होणे, घरांची पडझड होणे, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरीत करणे या करीता आपदग्रस्तांना दृष्काळ सदृष्य परिस्थितीत लागू असणान्या सवलती देण्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक १०.१०.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. त्यामध्ये सहकार विभागाशी संबंधित खालील सवलतींचा समावेश आहे.

advertisement

(१) सहकारी कर्जाचे पुनर्गठन

(२) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती (एक वर्षासाठी)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

महसूल आणि वन विभाग शासन निर्णय दिनांक १०.१०.२०२५ मध्ये नमूद अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना उपरोक्त सवलत लागू असणार आहे. बाधित तालुक्याच्या सर्व गावातील बाधीत शेतक-यांच्या अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रुपांतरण आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती बाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC), महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महायुती सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी कर्जाच्या वसुलीवर 1 वर्षाची स्थगिती!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल