लहानपणी आई वडिलांचं छत्र हरवलं
श्रेया पुंडलिक गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर इथं आपल्या बहिणीसोबत राहत होती. बुधवारी अचानक तिने राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला. ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत श्रेया आणि तिची बहीण स्नेहल यांच्या डोक्यावरील आई वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं होतं. पण दोघी बहिणी खचून न जाता जिद्दीने शिक्षण घेत होत्या. श्रेयाच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मंद्रूप पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे.
advertisement
घरी विसरलेला डब्बा आणायला गेली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी श्रेया आणि तिची मोठी बहीण स्नेहल या दोघी कॉलेजला जाण्यासाठी सोलापूरला निघाल्या होत्या. मात्र जेवणाचा डबा घरी विसरल्याने त्या दोघी पुन्हा घरी आल्या. घरी आल्यानंतर मोठी बहीण स्नेहल ही बाहेर बाथरूमला गेली. तेव्हा श्रेयाने घरामध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेतला. राहत्या घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मोठी बहीण स्नेहल थोड्या वेळात घरी आली. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. आवाज दिला तरी तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे स्नेहलने खिडकीतून डोकावून पाहिलं. तर श्रेया पंख्याला लटकत असल्याचे तिला दिसले. हा प्रकार पाहिल्यानंतर तिने घराशेजारील चुलत भावांना ओरडून याची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून दरवाजा तोडला. एका खाजगी वाहनातून तातडीने बेशुद्धावस्थेत श्रेयाा मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालय आणले. पण तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. श्रेयाने आत्महत्या का केली?याचं कारण अद्याप समोर आलं नाही. मंद्रुप पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे.