दिव्यांग मुलांच्या कलागुणांना मिळणार वाव, पुण्यात विशेष छंदकला वर्गाची सुरूवात, Video
एल्फिन्स्टन ब्रिजच्या कामाला सुरूवात झाल्यापासून दररोज एसटी प्रशासनाच्या प्रवासाचा वेळेत आणि इंधनात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. दररोज प्रवाशांची समजूत काढताना एसटी प्रशासनाची दमछाक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहराच्या मध्यभागात असलेल्या एसटी आगारातून कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रसह संपूर्ण ठिकाणी दररोज अनेक बसेस जात असतात. परळच्या एसटी आगारातून मुंबई आणि उपनगरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. दररोज 186 बसेसची या आगारातून ये- जा होत असते. गेल्या महिन्यात प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील एल्फिन्स्टन पूल बंद केल्यापासून या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
advertisement
कॉफीच्या नावाखाली तुम्ही झुरळं तर पित नाही? व्हायरल पोस्टमुळे लोकांमध्ये भीती, पाहा संपूर्ण सत्य
वाहतूक पोलिसांनी एसटीला चिंचपोकळी पुलावरून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायी मार्गाचा वळसा एसटीसाठी अधिक डोकेदुखीचा ठरला आहे. या मार्गावर रोज सकाळी आणि सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने- एसटीच्या बसफेऱ्यांची दादर पूर्व ते परळ एसटी आगार या सात किमी प्रवासासाठी अर्धा ते एक तासांचा वेळ वाया जात आहे. एसटीच्या ताफ्यात बहुतांश गाड्या डिझेलवर चालणार्या आहेत. या गाड्या तासभर वाहतूक कोंडीत अडकल्याने इंधनाचाही मोठा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दररोज प्रवाशांची समजूत काढताना एसटी कर्मचार्यांची दमछाक होत आहे.
दिवाळी खरेदीची ही संधी नका सोडू, 20 रुपयांपासून मिळतायत वस्तू, ठाण्यात इथं द्या भेट
दादरहून सुटणाऱ्या बसेसला परळ आगारात येईपर्यंत अर्धा ते एक तासांचा रोज विलंब होतो. नियोजित वेळेपेक्षा उशिराने बस गाड्या सुटत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांची समजूत काढताना एसटी कर्मचार्यांची दमछाक होत आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने अनेक इलेक्ट्रिक बसेस प्रवासी सेवेत दाखल केल्या आहेत. यापैकी बहुतांश बसेस दादरमधून चालवल्या जातात. मात्र या बसेस चार्जिंगसाठी परळ आगारातील चार्जिंग पॉइंटवर नेल्या जातात. त्यांना केवळ चार्जिंगसाठी दादर ते परळ असा दुहेरी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या बसेसचा अधिक खोळंबा होतोय..