TRENDING:

gadchiroli : मोठा घातपाताचा डाव उधळला, 2 जहाल माओवाद्यांचा खात्मा, 8 लाखांचं होतं बक्षीस!

Last Updated:

मृतकांमध्ये उपक्रमांडर दुर्गेश मट्टीचा समावेश आहे.15 पोलीस जवान ठार झालेल्या जमभुळखेडा घटनेत दुर्गेशची मोठी भूमिका होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
(कारवाईत ठार झालेला माओवादी)
(कारवाईत ठार झालेला माओवादी)
advertisement

गडचिरोली, 14 डिसेंबर : गडचिरोलीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत माओवाद्यांचा घातपाताचा कट उधळला आहे. चकमकीत दोन जहाल माओवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलं आहे. सी सिक्सटी कमांडो पथकांने ही कामगिरी केली आहे. यावेळी माओवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील बोधिनतोलामध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी चकमकीत दोन माओवादी ठार मारण्यात आलं आहे. सी 60 कमांडो पथकांने ही कारवाई केली. दोन्ही माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. घटनास्थळी 1 ak 47 अत्याधुनिक बंदुकीसह 1 एसएलआर रायफल सापडली आहे. मृतकांमध्ये उपक्रमांडर दुर्गेश मट्टीचा समावेश आहे.15 पोलीस जवान ठार झालेल्या जमभुळखेडा घटनेत दुर्गेशची मोठी भूमिका होती.

advertisement

धक्कादायक म्हणजे, कसनसूर दलमचे माओवादी घातपाताच्या तयारीत होते. सी सिक्सटी कमांडो पथकांनी वेळीच कारवाई केल्यामुळे माओवाद्यांचा घातपत्राचा प्रयत्न उधळला गेला. चकमकीत ठार झालेल्या जहाल माओवादी दुर्गेश वट्टीवर 8 लाखाचे बक्षीस होते. जंगलात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. माओवाद्यांचे मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणले जाणार आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

(सविस्तर बातमी लवकरच)

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
gadchiroli : मोठा घातपाताचा डाव उधळला, 2 जहाल माओवाद्यांचा खात्मा, 8 लाखांचं होतं बक्षीस!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल