मिळालेल्या माहितीनुसार, मेळघाटातील सिमोरी येथील फुलवंती राजू धिकार या महिलेची 3 फेब्रुवारी रोजी अचलपूरच्या रुग्णालयात प्रसुती झाली. घरी गेल्यानंतर या बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून बाळाच्या नातेवाईकाने भोंदू बाबाकडे नेऊन बाळाला गरम चटके दिल्याची चर्चा आहे. बाळाच्या हृदयाचा त्रास आहे, त्याला श्वास घ्यायला त्रास होतो त्रास त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला नागपूरला देखील रेफर करावं लागू शकतं अशी माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या या बाळावर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील अति दक्षता विभागात उपचार सुरू आहे.
advertisement
बाळाच्या बापालाच माहिती नाही!
'माझ्या मुलाला चटके कोणी दिले ते मला माहित नाही. जेव्हा चटके दिले तेव्हा मी घरी नव्हतो' अशी प्रतिक्रिया लहान बाळाच्या वडिलांनी दिली. त्यामुळे नेमकं बाळाच्या पोटाला चटके दिले कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे. मेळघाटात लहान बाळांना कुठलाही आजार झाला तर एकतर भुमक्या मार्फत अथवा घरातील ज्येष्ठ सदस्यांकडून पोटावर चटके देण्याची प्रथा आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असावा मात्र सध्या तक्रार दाखल होण्याच्या भीतीने चटके कोणी दिले हे मात्र बाळाचे वडील सांगण्यास तयार नाहीत.
अंधश्रद्धेतून प्रकार
दरम्यान, या घटनेनं मेळघाटातील आदिवासींचा अजूनही आरोग्य यंत्रणेवर विश्वास नसल्याचा स्पष्ट होत असून मेळघाटातील आदिवासी अजूनही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन भूमका म्हणजेच अघोरी बाबा कडून उपचार करून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात चाललं तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.