विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी लोकल 18शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एसटीने प्रवास करणाऱ्यांची नेहमीच मोठी गर्दी होत असते. नियमित धावणाऱ्या गाड्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांनी भरून जात असल्याने अनेकांना जागा मिळण्यास अडचणी येतात. ही गैरसोय टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाने नियोजन केलं आहे. सणासुदीच्या काळात विविध मार्गांवर एकूण 29 अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहेत.
advertisement
याशिवाय, प्रवाशांची संख्या अचानक वाढल्यास परिस्थितीनुसार तत्काळ जास्त गाड्यांचे नियोजन करून संबंधित मार्गावर पाठवल्या जाणार असल्याची माहिती एसटी विभागाने दिली आहे. दिवाळीच्या काळात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात प्रवासी गावी जाणार असल्याने प्रशासनाने आधीच नियोजन करून नागरिकांना दिलासा दिला आहे.
या मार्गावर धावणार अतिरिक्त एसटी बसेस?
सिडको बसस्थानक - नागपूर, लातूर, अकोला
मध्यवर्ती बसस्थानक - नागपूर, बुलढाणा, अकोला
पैठण आगार - पुणे
सिल्लोड आगार - बुलढाणा, जळगाव, भुसावळ, नाशिक
वैजापूर आगार - बुलढाणा, नाशिक
गंगापूर आगार - पुणे, नाशिक, शिर्डी
कन्नड आगार - धुळे, भुसावळ
सोयगाव आगार - जळगाव, भुसावळ