संभाजीनगर शहरामध्ये राहणाऱ्या तनिष्का आणि नित्या या दोघी सख्या बहिणी आहेत. त्यांचे वडील नवनाथ वेताळ हे वकील आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान त्यांना ट्रेकिंग करण्याची आवड निर्माण झाली. तेव्हापासून ते वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकसाठी जातातात. मोठी मुलगी नित्यादेखील त्यांच्यासोबत ट्रेकिंगसाठी जाते. तीन वर्षांची असताना नित्याने संभाजीनगर शहरातील गोगाबाबा टेकडी चढली होती. धाकटी तनिष्का देखील वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ट्रेकिंग करत आहे.
advertisement
नित्या आणि तनिष्काची आई रेणुका वेताळ म्हणाल्या, आम्ही भंडारदरा आणि हरिश्चंद्रगड फिरण्यासाठी गेलो होतो. भंडारदरा फिरून झाल्यानंतर हरिचंद्र गडावर जायचं होतं पण, तो लांब असल्यामुळे तिथे जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग कळसुबाई या ठिकाणी मुक्काम करण्याचं ठरलं. त्यानंतर आम्ही दोन्ही मुलींना विचारलं की, तुम्ही हे शिखर सर करणार का? तेव्हा तो दोघींनी लगेच होकार दिला."
रेणुका यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेताळ कुटुंबाने वारी गावापासून चढायला सुरुवात केली होती. सकाळी 7 ते 11 या कालावधीत हे कुटुंब शिखरावर पोहचलं. विशेष म्हणजे पाऊस आणि धुकं असूनही ट्रेक पूर्ण करण्यात त्यांना यश आलं. विशेष म्हणजे नित्या आणि तनिष्का देखील न थकता आई-वडिलांच्या बरोबरी चढत होत्या. मुलींनी कळसुबाई शिखर सर केल्याचा पालकांना आनंद झाला आहे. भविष्यामध्ये एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा असल्याचं नित्याने सांगितलं आहे.